Home | Jeevan Mantra | Dharm | ashadhi ekadashi 2018 vrat vidhi worship method

आषाढी एकादशी 23 ला : सुख-समृद्धीसाठी अशाप्रकारे करा हे एकादशी व्रत

रिलिजन डेस्क | Update - Jul 22, 2018, 12:47 PM IST

आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. धर्म ग्रंथानुसार या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिने पाताळात

 • ashadhi ekadashi 2018 vrat vidhi worship method

  आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. धर्म ग्रंथानुसार या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिने पाताळात शयन करतात. या चार महिन्यांना चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास देवाच्या भक्तीचा काळ मानण्यात आला आहे. या दरम्यान कोणतेही मंगलकार्य केला जात नाहीत. या वर्षी देवशयनी (आषाढी) एकादशी 23 जुलै, सोमवारी आहे.


  व्रत विधी -
  आषाढी (देवशयनी) एकादशीच्या दिवशी स्नान करून पवित्र झाल्यानंतर संकल्प करून भगवान श्रीविष्णूचे पूजन करावे. श्रीहरिला फुल, फळ, तीळ, दुध, पंचामृत इ. पदार्थ अर्पण करावेत. दिवसभर उपवास करावा. व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत. रात्रभर जागरण करावे. या व्रताचे समापन एकादशीला होत नाही तर द्वादशीला होते. यामुळे द्वादशी तिथी (24 जुलै, मंगळवार) ला ब्राह्मणाला जेवणासाठी आमंत्रित करून दक्षिणा देऊन तृप्त करावे. अशाप्रकारे देवशयनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


  देवशयनी एकादशी व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
  1. पूजेमध्ये अक्षता अवश्य अर्पण कराव्यात
  2. आळस करू नये
  3. श्रीहरीचे नामस्मरण करावे.
  4. तुळशीचे पान टाकून देवाला नैवेद्य दाखवावा.
  5. रात्री जागरण करावे
  6. ब्रह्मचर्यचे पालन करावे.

Trending