Home | Jeevan Mantra | Dharm | Chaturmaas 2018 Dhan Prapti che upay

चातुर्मास : 20 नोव्हेंबरपर्यंत रोज सकाळी उठताच करा हे 5 काम, दुर्भाग्य होईल दूर

रिलिजन डेस्क | Update - Jul 24, 2018, 12:03 AM IST

सोमवार 23 जुलैच्या देवशयनी एकादशीपासून मंगळवार 20 नोव्हेंबर देवउठनी एकादशीपर्यंत चातुर्मास राहील.

 • Chaturmaas 2018 Dhan Prapti che upay

  सोमवार 23 जुलैच्या देवशयनी एकादशीपासून मंगळवार 20 नोव्हेंबर देवउठनी एकादशीपर्यंत चातुर्मास राहील. या चार महिन्यांमध्ये भगवान विष्णू विश्राम करतात, यामुळे या दिवसांमध्ये सर्व मंगलकार्य वर्ज्य असतात. चातुर्मासात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक मास येतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार चातुर्मासात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे आणि सर्व इच्छापूर्तींसाठी ज्योतिषचे उपाय करावेत. येथे जाणून घ्या, चातुर्मासात कोणकोणते उपाय करावेत..


  पहिला उपाय
  रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या कलशाने सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. या दरम्यान मंत्र ऊँ खगाय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


  दुसरा उपाय
  चातुर्मासात महादेव सृष्टीचे संचालन करतात. या दिवसांमध्ये रोज सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावे. यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा. दूध अर्पण करण्यासाठी चांदीचा कलश वापरावा.


  तिसरा उपाय
  देवी दुर्गा मंत्र : या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ चा रोज जप करावा. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • Chaturmaas 2018 Dhan Prapti che upay

  चौथा उपाय 
  प्रत्येक कामाची सुरुवात श्रीगणेश पूजेने करावी. सकाळी-सकाळी श्रीगणेश मंत्र - वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ चा जप करावा.

 • Chaturmaas 2018 Dhan Prapti che upay

  पाचवा उपाय 
  रोज सकाळी उठताच दोन्ही हातांचे दर्शन घेऊन कुलदेवतेचे स्मरण करावे. अशाप्रकारे दिवसाची सुरुवात केल्याने संपूर्ण दिवसभर सकारात्मक फळ प्राप्त होतात.

Trending