Home | Jeevan Mantra | Dharm | Chaturmas Start Not Eat Green Vegetables

चातुर्मास सुरु : या 4 महिन्यात काय करावे आणि काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Jul 25, 2018, 12:05 AM IST

हिंदू धर्मामध्ये चातुर्मास (देवशयनी एकादशी ते देवउठनी एकादशीपर्यंतचा काळ)चे विशेष महत्त्व आहे.

 • Chaturmas Start Not Eat Green Vegetables

  हिंदू धर्मामध्ये चातुर्मास (देवशयनी एकादशी ते देवउठनी एकादशीपर्यंतचा काळ)चे विशेष महत्त्व आहे. चातुर्मासात मंगलकार्य केले जात नाहीत. या काळात धार्मिक कार्याकडे विशेष लक्ष दिले जाते. चातुर्मासाच्या अंतर्गत श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे चार महिने येतात. यावर्षी 23 जुलै सोमवारपासून चातुर्मास सुरु झाला असून 20 नोव्हेंबर मंगळवारपर्यंत राहील.


  उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या काळात भगवान विष्णू विश्राम करतात. धर्म ग्रंथानुसार चातुर्मास काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, चातुर्मासात कोणकोणते काम करावे आणि कोणते करू नये...


  चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत...
  1. पलंगावर झोपू नये, पत्नीसोबत सहवास करू नये, मांस खाऊ नये, मध, गुळ, हिरव्या भाज्या, मुळा, वांगे हे पदार्थही खाऊ नयेत.
  2. पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी एक भुक्त (एकदाच जेवण), आयाचित (न मागितलेले) जेवण किंवा उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे.
  3. तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये.
  4. चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये.
  5. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य (गायीचे दुध, दही, तूप, गोमुत्र) सेवन करावे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, चातुर्मासाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व...

 • Chaturmas Start Not Eat Green Vegetables

  चातुर्मासाचे वैज्ञानिक महत्त्व 
  चातुर्मास मूलतः पावसाळी ऋतू असतो. या काळात ढग आणि पावसामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर व्यवस्थित येऊ शकत नाही. सूर्याचा प्रकाश कमी होते देवतांच्या विश्रामाचे प्रतीक आहे. या काळात शरीराची पचन शक्ती कमी होते, ज्यामुळे शरीर थोडे कमजोर होते. आधुनिक युगामध्ये वैज्ञानिकांनीही केलेल्या रिसर्चनुसार चातुर्मासात (मुख्यतः वर्षा ऋतूमध्ये) विविध प्रकारचे किटाणू (बॅक्टेरिया आणि व्हायरस) उत्पन्न होतात.

 • Chaturmas Start Not Eat Green Vegetables

  चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व
  पुराणानुसार, भगवान विष्णू या चार महिन्यात पाताळात बळी राजाकडे निवास करून कार्तिक शुक्ल एकादशीला परत येतात. अर्थात या काळात भगवान विष्णू विश्राम अवस्थेत असतात, यामुळे या काळात सकारात्मक शक्तींना बळ पोहोचवण्यासाठी व्रत, उपवास, हवन आणि यज्ञ करण्याचे विधान आहे. या काळात मुंज, विवाह, दिशाग्रहण संस्कार आणि इतर मंगलकार्य केले जात नाहीत. 

Trending