सोमवारी सकाळी तुळशीजवळ / सोमवारी सकाळी तुळशीजवळ दिवा लावून करा हा 1 मंत्र उच्चार, घरात राहील सुख-समृद्धी

रिलिजन डेस्क

Jul 23,2018 12:03:00 AM IST

आज (सोमवार, 23 जुलै) आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि काही खास उपाय केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. येथे जाणून घ्या, या दिवशी व्रत आणि उपाय कोणते करावे...


या विधीनुसार करा व्रत
- देवशयनी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. घर स्वच्छ करून पवित्र जल घरात शिंपडावे.


- त्यानंतर देवघरात किंवा इतर पवित्र ठिकाणी भगवान विष्णू यांची सोने, चांदी, तांबे किंवा पितळेची मूर्ती स्थापित करावी.


- त्यानंतर भगवान विष्णूंना कुंकू, अक्षता, फुल, गांड अर्पण करावे. शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि पितांबर (पिवळे वस्त्र) अर्पण करावे. त्यानंतर व्रत कथा ऐकावी. आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा.


- धर्म शास्त्रानुसार या दिवशी व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीने चातुर्मास नियमांचे पालन केल्यास देवशयनी एकादशी व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होऊ शकते.


हा उपाय करावा
देवशयनी एकादशीच्या सकाळी तुळशीसमोर दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर खालील मंत्राचा 11 वेळेस उच्चार करावा.


महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।


या उपायाने तुमच्या घरात नेहमी सुख-समृद्धी कायम राहते आणि सौभाग्य वाढते.

X
COMMENT