आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने हे 5 काम करणे आवश्यक मानले जाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 16 जून रोजी ईद आहे. हा मुस्लिम धर्माचा सर्वात खास सण आहे. इस्लाम एकेश्वरवादी धर्म आहे. सर्व मस्लिम कुराणमध्ये सांगण्यात आलेल्या नियमाचे पालन करतात. कुराण अल्लाहकडून मुहम्मद पैगंबर यांच्याद्वारे मनुष्यापर्यंत पोहोचवले आहे. इस्लाममध्ये अल्लाहला एकमेव परमात्मा, सर्वशक्तिमान मानले जाते. हजरत मुहम्मद यांना अल्लाहचा संदेशवाहक किंवा पैगंबर मानले गेले आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी 5 काम आवश्यक सांगण्यात आले आहते. याशिवाय त्यांचे जीवन अपूर्ण मानले जाते. हे पाच काम मुस्लिम व्यक्तीचे कर्तव्य (फर्ज) असून प्रत्येकाने याचे पालन करणे आवश्यक मानले गेले आहे.


पहिले काम - तौहीद
तौहीद किंवा शहादा या शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त अल्लाहवर विश्वास ठेवणे. अल्लाह एक आहे आणि मुहम्मद साहब अल्लाहचे पैगंबर आहेत. ही गोष्ट प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


दुसरे काम - नमाज 
प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी दिवसातून पाच वेळेची नमाज करणे आवश्यक नियम आहे.


तिसरे काम - रोजा ठेवणे
रमजान महिन्यात रोजा ठेवणे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. रमजानमध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीकाही खाणे-पिणे वर्ज्य आहे.


चौथे काम - जकात
कुराणनुसार मुस्लिम व्यक्तीने आपल्या कमाईतील काही हिस्सा गरीब आणि गरजू लोकांना दान करावा. यालाच जकात म्हणतात.


पाचवे काम - हज यात्रा करणे
मुस्लिम समुदायासाठी हज एक पवित्र तीर्थ यात्रा आहे. याशिवाय व्यक्तीचे जीवन पूर्ण मानले जात नाही.

बातम्या आणखी आहेत...