आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळीग्राम असलेल्या घरामध्ये देवी लक्ष्मी करते निवास, कमी पडत नाही पैसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळशीजवळ शाळीग्राम (एकप्रकारचा दगड) ठेवून रोज पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शाळीग्रामला भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जाते. ज्या घरामध्ये तुळस आणि शाळीग्रामची पूजा होते, तेथे गरिबी राहत नाही. येथे जाणून घ्या, शाळीग्रामशी संबंधित खास गोष्टी...


1. ज्याठिकाणी भगवान शाळीग्रामची पूजा होते, तेथे श्रीविष्णू आणि महालक्ष्मी एकत्र निवास करतात.


2. हे स्वयंभू मानले जाते म्हणजेच यांची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. कोणताही व्यक्ती देवघरात शाळीग्राम स्थापित करू शकतो.


3. शाळीग्राम वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असते. या दगडावर (शिळा) शंख, गदा, पद्म यासारखे चिन्ह असतात.


4. शाळीग्राम पूजा तुळशीशिवाय पूर्ण मानली जात नाही. तुळस अर्पण केली तरच शाळीग्राम प्रसन्न होतात.


5. शाळीग्राम आणि भगवती स्वरूप तुळशीचे लग्न लावल्यास सर्व कलह, पाप, दुःख आणि रोग दूर होतात.


6. तुळस-शाळीग्राम विवाह केल्याने कन्यादान केल्याने पुण्य प्राप्त होते.


7. पूजा करताना शाळीग्रामला चंदन लावावे आणि तुळस अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा.  हा उपाय तन, मन आणि धन सर्व अडचणी दूर करू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान शाळीग्राम पूजेचे इतर काही खास लाभ...

बातम्या आणखी आहेत...