आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाला का अर्पण करतात दुर्वा, नेहमी लक्षात ठेवा या 6 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा आहे. दुर्वा अर्पण करताना श्रीगणेशाच्या 11 खास मंत्राचा उच्चार करावा. दुर्वा एक प्रकारचे गवत आहे. उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीगणेशाला दुर्वा का अर्पण करतात या संदर्भात एक कथा प्रचलित आहे. 


कथेनुसार प्राचीन काळात अनलासुर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याच्या कोपामूळे स्वर्ग आणि धरतीवर त्राही-त्राही माजली होती. अनलासुर ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकांना जिंवत गिळून टाकायचा. दैत्याच्या या त्रासाने त्रस्त होऊन देव इंद्रासहित सर्व देवी-देवता आणि प्रमुख ऋषि-मुनि महादेवाची प्रार्थना करायला लागले. सर्वांनी महादेवाची प्रार्थना केली आणि अनलासुराचा आतंकाचा नाश करण्याची विनंती केली. महादेवाने सर्व देवी-देवतांचे आणि ऋषि-मुनींची प्रार्थना ऐकून सांगितले की, अनलासुराचा अंत केवळ श्रीगणेश करू शकतात.


श्रीगणेशाचे पोट बरेच मोठे आहे त्यामुळे अनलासुराला गिळणे सोपे आहे. हे ऐकल्यानंतर सर्व देवी-देवता श्रीगणेशाकडे गेले. गणेशाची स्तुती करुन त्यांना प्रसन्न केल्यानंतर श्रीगणेशाने अनलासुराला पकडून गिळंकृत केले.


जेव्हा श्रीगणेशाने  अनलासुराला गिळले त्यानंतर त्याच्या पोटामध्ये जळजळ होण्यास सुरुवात झाली. ब-याच प्रकारचे उपाय केल्यानंतरही गणपतीच्या पोटातील जळजळ शांत होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषींनी 21 दूर्वांची जूडी तयार करुन गणपतीला खाण्यास दिली. दूर्वांची जूडी खाल्यानंतर पोटातील जळजळ शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दूर्वा वाहण्याच्या परंपरेला प्रारंभ झाला.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करताना कोणत्या मंत्रांचा उच्चार करावा...

बातम्या आणखी आहेत...