Home | Jeevan Mantra | Dharm | Garud Puran Astrology Measures How To Avoid Sin

नकळतपणे जीव हत्या झाल्यास करा या 3 पैकी कोणताही 1 उपाय, या पापातून मुक्त व्हाल

रिलिजन डेस्क | Update - Jul 14, 2018, 12:12 PM IST

अनेकवेळा वाहन चालवताना किंवा काही काम करताना नकळतपणे आपल्यामाकडून जीव हत्या होते.

 • Garud Puran Astrology Measures How To Avoid Sin

  अनेकवेळा वाहन चालवताना किंवा काही काम करताना नकळतपणे आपल्यामाकडून जीव हत्या होते. या व्यतिरिक्त पायी चालतानाही असंख्य छोटे-छोटे जीव-जंतू आपल्या पायाखाली मरतात. ग्रंथामध्ये हेसुद्धा एक पापात मानण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार या पापाचे अशुभ परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, ग्रंथामध्ये या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी प्रायश्चितचे विधान सांगण्यात आले आहे. यामुळे अशुभ प्रभावापासून आपले रक्षण होऊ शकते. येथे जाणून घ्या, हे खास उपाय...


  पहिला उपाय
  एक सुकलेले नारळ घेऊन ते वरील बाजूने थोडेसे कापावे. त्यानंतर या नारळात साखर भरावी. हे साखर भरलेले नारळ इहाड्या सुनसान ठिकाणी जमिनीत पुरून टाकावे. यामुळे मुंग्या, जीव-जंतू हे नारळ सहजपणे खाऊ शकतील. या उपायाने जीव हत्येच्या पापाचे प्रायश्चित होईल तसेच राहू-केतुचे दोषही कमी होतील.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • Garud Puran Astrology Measures How To Avoid Sin

  दुसरा उपाय 
  शनिवारी एखाद्या गरीब किंवा अपंग व्यक्तीला अन्नदान करावे. यामुळे जीव हत्येच्या पापातून मुक्त होऊ शकता.

 • Garud Puran Astrology Measures How To Avoid Sin

  तिसरा उपाय 
  प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला गायीला हिरवा चारा खाऊ घालावा, श्वानाला पोळी खाऊ घालावी आणि तलाव किंवा नदीतील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. या उपायांनी कुंडलीतील दोष कमी होऊ शकतात.

Trending