Home | Jeevan Mantra | Dharm | Good Signs About Blessings Of God And Goddess

या 9 गोष्टी घडू लागल्यास समजावे तुमच्यावर आहे देवाची विशेष कृपा

रिलिजन डेस्क | Update - Jul 07, 2018, 11:40 AM IST

काही लोकांवर देवाची विशेष कृपा राहते आणि त्यांना भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे पूर्वाभास होतात.

 • Good Signs About Blessings Of God And Goddess

  काही लोकांवर देवाची विशेष कृपा राहते आणि त्यांना भविष्यात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचे पूर्वाभास होतात. देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा-पाठ, मंत्र जप, काही खास उपाय करतात परंतु काहीच लोकांना देवाची कृपा प्राप्त होते. गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित गरुड पुराण अंकाच्या आचार कांडनुसार जाणून घ्या, अशा काही गोष्टी ज्यावरून देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचा संकेत देतात.


  1. देवाची कृपा असलेल्या लोकांना पूर्वाभास होतात. या लोकांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आभास पूर्वीपासूनच होतो.


  2. एखादा व्यक्ती शिक्षित असेल आणि आपल्या विद्येने पैसा कमवत असेल तर हा शुभ संकेत आहे. कारण फार कमी लोक आपल्या विद्येचा योग्य उपयोग करू शकतात.


  3. ज्या लोकांचे आरोग्य नेहमी चांगले राहते, ते भाग्यशाली असतात आणि हासुद्धा देवतांच्या प्रसन्नतेचा संकेत आहे.


  4. देवाच्या कृपने व्यक्तीचे मन शांत राहते. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो सामान्य राहतो.


  5. ज्या व्यक्तीचे अपत्य आज्ञाधारक असेल त्याने समजून घ्यावे की, त्याच्यावर देवाची विशेष कृपा आहे. कलियुगात बहुतांश लोक अपत्यामुळे अडचणीत आहेत. यामुळे संस्कारी अपत्य असलेले लोक भाग्यशाली आहेत.


  6. चांगली-वाईट परिस्थिती समजून घेण्याची क्षमता असलेल्या लोकांवर कुलदेवतीची कृपा राहते.


  7. ज्या लोकांना स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होते, त्यांच्यावर सर्व देवतांची कृपा कायम राहते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Good Signs About Blessings Of God And Goddess

  8. सुयोग्य जोडीदार मिळणे हासुद्धा देवाच्या कृपेचा संकेत आहे. 

 • Good Signs About Blessings Of God And Goddess

  9. ज्या व्यक्तीवर देवी-देवता प्रसन्न असतात, तो व्यक्ती कोणावरही क्रोध करत नाही आणि इतरांविषयी वाईट विचार करत नाही.

Trending