आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा 13 महिन्‍यांचे राहिल नववर्ष, जाणून घ्‍या इतरही खास गोष्‍टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांगल्याचे प्रतीक असणारा गुढीपाडवा रविवारी (दि. १८) आहे. यानिमित्त घरोघरी गुढ्या उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. यंदाच्या वर्षी शके १९४० विलंबी संवत्सर असून, १६ मे ते १३ जूनदरम्यान अधिक ज्येष्ठ महिना असल्याने नववर्ष १३ महिन्यांचे आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहात असल्यास तिथे गुढीपूजन व पंचांग पूजन अवश्य करावे, असे पंचांगकर्ते आेंकार मोहनराव दाते यांनी सांगितले.

 

श्री. दाते म्हणाले, 'ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे नवीन उद्योग, व्‍यवसायाचा शुभारंभ करण्‍यास हा उत्‍तम मुहूर्त समजला जातो.

 

आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ग्रहांवर आधारित असलेली ही कालगणना पंचांगाच्‍या माध्‍यमातून आपल्‍याला कळते म्‍हणून संवत्‍सरारंभाच्‍या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे. सकाळी लवकर गुढी उभी करून सूर्यास्‍ताच्‍या दरम्‍यान नमस्‍कार करून ती पुन्‍हा उतरवून ठेवावी. त्‍यासाठी स्‍वतंत्र मुहूर्ताची वेळ, राहू, काल इत्‍यादींचा संबंध नाही. यंदा 16 मे पासून अधिक महिना असल्‍याने विवाह मुहूर्त नाहीत.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा; कशी उभारावी गुढी आणि नववर्षातील नवलाई...

 

बातम्या आणखी आहेत...