Home | Jeevan Mantra | Dharm | guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

हिंदू धर्मातील 8 महान गुरु, यामधील 2 गुरु आजही जिवंत असल्याची मान्यता

रिलिजन डेस्क | Update - Jul 27, 2018, 02:52 PM IST

हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासूनच गुरूंचा मान-सन्मान करण्याची प्रथा चालू आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गुरूंचे

 • guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

  हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासूनच गुरूंचा मान-सन्मान करण्याची प्रथा चालू आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गुरूंचे वर्णन आढळून येते, ज्यांनी गुरु-शिष्याच्या नात्याला एक विशिष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. यामध्ये परशुराम आणि महर्षी वेदव्यास यांना आजही जिवंत असल्याचे मानले जाते. आज (27 जुलै, शुक्रवार) गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या महान गुरुंविषयी खास माहिती देत आहोत.


  महर्षी वेदव्यास
  धर्म ग्रंथानुसार महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचे अवतार होते. यांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन होते. यांनीच वेदांची विभागणी केली असल्यामुळे यांचे नाव वेदव्यास पडले. महाभारत या श्रेष्ठ धर्माची रचना यांनीच केली आहे. यांचे वडील महर्षी पाराशर तसेच आई देवी सत्यवती होती. वैशम्पायन, सुमन्तु मुनी, रोमहर्षण इ. महर्षी यांचे महान शिष्य होते.


  महर्षी वेदव्यासांच्या वरदानाने झाला होता कौरांवाचा जन्म
  एकदा वेदव्यास हस्तिनापुरला गेले होते. तेथे गांधारीने त्यांची खूप सेवा केली. त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन महर्षी वेदव्यास यांनी गांधारीला शंभर पुत्र होण्याचे वरदान दिले. वेळ आल्यानंतर गांधारी गरोदर राहिली, परंतु तिच्या गर्भातून मांसाचा गोल पिंड बाहेर पडला. गांधारी तो पिंड नष्ट करणार होती. वेदव्यासांनी गांधारीला 100 मातीच्या भांड्यात तूप भरून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर महर्षी वेदव्यास यांनी त्या पिंडाचे 100 तुकडे करून त्यांना वेगवेगळ्या भांड्यात ठेवले. काही काळानंतर गांधारीच्या 100 पुत्रांचा जन्म झाला.


  परशुराम -
  परशुराम महान योद्धा आणि गुरु होते. हे जन्मापासूनच ब्राह्मण होते परंतु यांचा स्वभाव क्षत्रियांसारखा होता. हे भगवान विष्णूंचे अंशावतार होते. यांनी महादेवाकडून अस्त्र-शास्त्राची विद्या अर्जित केली होती. यांच्या वडिलांचे नाव जमदग्नी तसेच आईचे नाव रेणुका होते. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी यांनी अनेकवेळा पृथ्वीला क्षत्रिय विहीन केले होते. भीष्म, द्रोणाचार्य यांचे शिष्य होते. धर्म ग्रंथानुसार परशुराम अमर असून आजही पृथ्वीवर कुठेतरी तपश्चर्येत लीन आहेत.


  कर्णाला दिला होता शाप -
  महाभारतानुसार कारण परशुरामांचा शिष्य होता. कर्णाने परशुराम यांना स्वतःची ओळख ब्राह्मण पुत्राच्या रुपात दिली होती. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. त्याच वेळी एक किडा कर्णाच्या मांडीला चावला. गुरूंची झोप मोडू नये म्हणून कर्णाने सर्व वदन सहन केल्या. झोपेतून उठल्यानंतर गुरु परशुराम यांच्या लक्षात आले की, कर्ण ब्राह्मण पुत्र नसून क्षत्रिय आहे. तेव्हा क्रोधीत परशुरामांनी कर्णाला शाप दिला की, मी शिकवलेली सर्व शास्त्र-अस्त्रांची विद्या तुला खूप आवश्यकता असेल तेव्हा विसरून जाशील. अशाप्रकारे गुरूंच्या शापामुळे कर्णाचा मृत्यू झाला.


  पुढे जाणून घ्या, इतर काही महान गुरु-शिष्यांची रोचक माहिती...

 • guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

  देवगुरु बृहस्पती
  देवतांचे गुरु बृहस्पती आहेत. महाभारताच्या आदी पर्वानुसार बृहस्पती महर्षी अंगिरा यांचे पुत्र आहेत. ग्रंथानुसार जेव्हा दानव देवतांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा देवगुरु बृहस्पती रक्षा मंत्रांनी देवतांचे पोषण आणि संरक्षण करत होते.


  देवगुरु बृहस्पती यांनी शचीला सांगितला होता एक उपाय
  एकदा देवराज इंद्र कोणत्यातरी कारणामुळे स्वर्ग सोडून निघून गेले होते. त्यांच्या जागेवर राजा नुहुष यांना स्वर्गाचा राजा बनवण्यात आले. स्वर्गाचा राजा होताच नुहुष यांच्या मनात पाप आले आणि त्यांनी इंद्राची पत्नी शचीवर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट शचीने देवगुरु बृहस्पती यांना सांगितली. देवगुरु बृहस्पती यांनी शचीला सांगितले की, तुम्ही नुहुष राजाला सप्तऋषींनी उचललेल्या पालखीत बसून आलात तरच मी तुम्हाला माझा स्वामी मानेल असा निरोप पाठवण्यास सांगितले. शचीचा निरोप मिळताच राजा नुहुष सप्तऋषींनी उचलेल्या पालखीत बसून शिचीकडे निघाला. काही अंतर पुढे गेल्यानंतर नुहुष राजाचे अगस्त्य ऋषींना लाथ मारली. क्रोधीत झालेल्या ऋषींनी त्याच क्षणी राजाला स्वर्गातून खाली पडण्याचा शाप दिला. अशाप्रकारे देवगुरु बृहस्पती यांच्या सल्ल्याने शचीच्या पतिव्रत धर्माचे रक्षण झाले.

 • guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

  शुक्राचार्य
  शुक्राचार्य देत्यांचे गुरु होते. हे भृगु ऋषी तसेच हिरण्यकशिपुची मुलगी दिव्या यांचे पुत्र होते. यांचे जन्मनाव शुक्र उशनस आहे. यांना महादेवाने मृत संजीवनी विद्येचे ज्ञान दिले होते. या विद्येच्या बळावर हे दानवांना पुन्हा जिवंत करत होते.


  भगवान वामन यांनी फोडला होता एक डोळा
  ग्रंथानुसार, भगवान विष्णू यांनी वामन रुपात राजा बलीकडे तीन पाऊले भूमी मागितली होती, तेव्हा सूक्ष्म रुपात शुक्राचार्य बलीच्या कमंडलूमध्ये जाऊन बसले. यामुळे पाणी बाहेर येणार नाही आणि बली राजाचा भूमी दान करण्याचा संकल्प अपूर्ण राहील. तेव्हा वामन रूपातील विष्णू यांनी बलीच्या कमंडलूमध्ये एक भुंगा सोडला, ज्यामुळे शुक्राचार्य यांचा एक डोळा फुटला.

 • guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

  वशिष्ठ ऋषी
  विशिष्ठ ऋषी सूर्यवंशचे कुलगुरू होते. त्यांच्या सल्ल्यानुसार राजा दशरथाने पुत्रेष्टि यज्ञ केला होता, याच्या फळरुपात श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्नचा जन्म झाला होता. प्रभू श्रीरामाने सर्व वेदांचे ज्ञान वशिष्ठ ऋषींकडुन अर्जित केले. श्रीराम वनवासातुन परत आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक आणि रामराज्याची स्थापना या ऋषींमुळेच शक्य झाली होती. त्यांनी वरिष्ठ पुराण, वशिष्ठ श्राध्दकल्प, वशिष्ठ शिक्षा इत्यादी ग्रंथांची रचना केली होती.
   

  ब्रम्हतेजने विश्वमित्राला हरवले होते
  एकदा राजा विश्वामित्र शिकार करतांना खुप लांब आले. थोडा वेळ आराम करण्यासाठी ते ऋषी वशिष्ठच्या आश्रमामध्ये थांबले. येथे त्यांना कामधेनु नंदीनीला पाहीले. यावेळी विश्वामित्र यांनी विशिष्ठींना ती गाय मागितली, गायीच्या बदल्यात मी तुम्हाला काहीही द्यायला तयार आहे असे ते म्हणाले परंतु वशिष्ठ ऋषींनी गाय देण्यास नकार दिला. तेव्हा विश्वामित्र बळजबरीने नंदिनी नेऊ लागले, तेव्हा वशिष्ठंच्या सांगण्यावरुन नंदिनीने क्रोधीत होऊन विश्वमित्र आणि त्यांच्या सर्व सैन्याला पळवुन लावले. ऋषी विशिष्ठांचे ब्रम्हतेज पाहुन विश्वमित्र यांना खुप आश्चर्य वाटले. त्यांनीही आपले राज्य त्यागले आणि तप करायला लागले.

 • guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

  गुरु सांदीपनि
  महर्षि सांदीपनि देव श्रीकृष्णाचे गुरु होते. श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्याकडुन शिक्षा घेण्यासाठी मथुराहुन उज्जयिनीमध्ये आले होते. महर्षि सांदीपनिने भगवान श्रीकृष्णाला 64 कलांचे शिक्षण दिले. श्रीकृष्णांनी या कला 64 दिवसांत शिकुन घेतल्या. मध्ये प्रदेशच्या उज्जैन शहरात आजही गुरु सांदीपनि यांचा आश्रम आहे.


  गुरु दक्षणा मध्ये मागितला पुत्र
  मथुरामध्ये कंसाच्या वधानंतर भगवान श्रीकृष्णला वासुदेव आणि देवकीने शिक्षण घेण्यासाठी अवंतिका नगरीत गुरु सांदीपानी यांच्याकडे पाठवले. शिक्षण घेतल्यानंतर गुरुदक्षिणेमध्ये ऋषि सांदीपानि यांनी श्रीकृष्णाला आपल्या पुत्राला मागितले. शंखासुर नावाच्या एका दैत्याने त्यांच्या पुत्राला उचलुन नेले होते. श्रीकृष्णाने वचन दिले की, तुमच्या मुलाला मी शोधुन आणेल. श्रीकृष्ण गुरुंच्या मुलाला शोधायाल समुद्र किना-यांपर्यंत आले. त्यांनी समुद्राला विचारले असता त्यांनी सांगितले की पंचत जातिचा दैत्य समुद्रात लपलेला आहे त्यानेच गुरुंच्या पुत्राला खाल्ले असावे. श्रीकृष्णाने समुद्रात जाऊन त्या दैत्य शंखासुराला मारुन त्याच्या पोटात गुरु पुत्राला शोधले परंतु तो सापडला नाही. नंतर शंखासुराच्या शरीरातील शंख घेऊन देव यमलोकात गेले आणि यमराजकडुन गुरु पुत्राला आणले आणि गुरुंना दक्षिणा दिली.

 • guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

  ब्रह्मर्षि विश्वामित्र
  धर्म ग्रंथांनुसार विश्वामित्र जन्मापासुनच क्षत्रिय होते, परंतु त्यांच्या तपस्येला प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना ब्रह्मर्षिचे पद दिले. आपला यज्ञ पुर्ण करण्यासाठी ऋषी विश्वामित्र यांनी श्रीराम आणि लक्ष्मणला आपल्या सोबत वनात नेले, येथे श्रीरामला त्यांनी अनेक दिव्यास्त्र प्रदान केले. रामचिरितमानस नुसार देव श्रीरामांना सीतेच्या स्वयंवरामध्ये ऋषि विश्वमित्र घेऊन गेले होते.


  ब्रम्हर्षि बनले विश्वमित्र
  विश्वमित्राच्या वडीलांचे नाव राजा गधि होते. राजा गधि यांची पुत्री सत्यवतीचा विवाह महर्षि भृगुचे पुत्र ऋचिक सोबत झाले होता. विवाहनंतर सत्यवतीने सासरे महर्षि भृगुकडे स्वतःसाठी व आपल्या आईसाठी पुत्राची मागणी केली होती. तेव्हा महर्षि भृगुने सत्यवतीला दोन फळे दिली, त्यांनी सांगितले की ऋतु स्नानानंतर तु उंबराच्या वृक्षाला आणि तुझ्या आईने पींपळाच्या वृक्षला आलिंगन दिल्यानंतर हे फळ खावे. परंतु सत्यवती आणि त्यांच्या आईने हे काम करण्यात चुक केली. ही गोष्ट महर्षि भृगुंना कळाली. तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की चुकीच्या वृक्षाला आलिंगन दिले, यामुळे तुझा पुत्र ब्राह्मण असला तरी क्षत्रिय गुणांचा असेल आणि तुझ्या आईचा पुत्र क्षत्रिय असुन ब्राम्हणांसारखा असेल. याच कारणामुळे क्षत्रिय असुनही विश्वामित्र यांना ब्रम्हर्षिचे पद मिळवले.

 • guru purnima 2018 hindu grantha 8 guru information

  द्रोणाचार्य
  द्रोणाचार्य महान धनुर्धर होते. त्यांनी कौरव-पांडवांना अस्त्र-शस्त्र शिकवले होते. महाभारतानुसार द्रोणाचार्य देवगुरु बृहस्पतिचे अंशावतार होते. त्यांच्या वडिलांचे नाव महर्षि भरव्दाज होते. द्रोणाचार्य यांचा विवाह शरव्दानची पुत्री कृपी सोबत झाला, महान अश्वत्थामा त्यांचा मुलगा होता. धनर्धर अर्जुन त्यांचा प्रिय शिष्य होता.


  अर्जुनला दिले होते वरदान
  एकदा गुरु द्रोणाचार्य नदीत स्नान करते होते, यावेळी त्यांना एका मगरीने पकडले. त्यांनी मदतीसाठी आपल्या शिष्यांना हाक मारली. तेथे दुर्योधन. युधिष्ठीर, भीम, दु:शासन अशे अनेक शिष्य होते, परंतु ते पाहुन सगळे घाबरले. यावेळी अर्जुनाने त्या मगरीला मारले आणि गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनला सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्याचे वरदान दिले.

Trending