आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्म ग्रंथानुसार चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 31 मार्च, शनिवारी आहे. शास्त्रानुसार या दिवशी पवनपुत्र हनुमानाची विधिव्रत पूजा केल्यास, ते प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
पूजन विधी -
हनुमानाची पूजा सुरु करण्यापूर्वी सर्वात पहिले आसनावर पूर्व दिशेला मुख करून बसा. समोर हनुमानाची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर हातामध्ये अक्षता आणि फुल घेऊन खालील मंत्राने हनुमानाचे ध्यान करा...
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं
दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं।
सकलगुणनिधानं वानराणामधीशं
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि।।
ऊं हनुमते नम: ध्यानार्थे पुष्पाणि सर्मपयामि।।
त्यानंतर अक्षता आणि फुल हनुमानाला अर्पण करा.
आवाहन - हातामध्ये फुल घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत हनुमानाचे आवाहन करून फुल अर्पण करा..
उद्यत्कोट्यर्कसंकाशं जगत्प्रक्षोभकारकम्।
श्रीरामड्घ्रिध्याननिष्ठं सुग्रीवप्रमुखार्चितम्।।
विन्नासयन्तं नादेन राक्षसान् मारुतिं भजेत्।।
ऊं हनुमते नम: आवाहनार्थे पुष्पाणि समर्पयामि।।
आसन - खालील मंत्राचा उच्चार करून हनुमानाला आसन अर्पित करा...
तप्तकांचनवर्णाभं मुक्तामणिविराजितम्।
अमलं कमलं दिव्यमासनं प्रतिगृह्यताम्।।
आसनासाठी कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करीत हनुमानासमोर एखाद्या भांड्यात किंवा
जमिनीवर तीन वेळेस पाणी सोडा..
ऊं हनुमते नम:, पाद्यं समर्पयामि।।
अध्र्यं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि।।
त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीला गंगेच्या किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करून त्यानंतर पंचामृत (तूप,साखर, दुध, दही, मध)ने अभिषेक करा.
पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घाला.
आता खालील मंत्राचा उच्चार करीत हनुमानाला वस्त्र अर्पण करा...
शीतवातोष्णसंत्राणं लज्जाया रक्षणं परम्।
देहालकरणं वस्त्रमत: शांति प्रयच्छ मे।।
ऊं हनुमते नम:, वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि।
त्यानंतर हनुमानाला गंध,शेंदूर, कुंकू, अक्षता, फुल, हार अर्पित करा. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करीत धूप-दीप दाखवा..
साज्यं च वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहम्।।
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने।।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपज्योतिर्नमोस्तु ते।।
ऊं हनुमते नम:, दीपं दर्शयामि।।
- त्यानंतर केळीच्या पानावर नैवेद्य ठेवून हनुमानाला दाखवा. त्यानंतर विलायचीयुक्त विड्याचे पान अर्पण करा.
पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करीत हनुमानाला दक्षिणा अर्पण करा.
ऊं हिरण्यगर्भगर्भस्थं देवबीजं विभावसों:।
अनन्तपुण्यफलदमत: शांति प्रयच्छ मे।।
ऊं हनुमते नम:, पूजा साफल्यार्थं द्रव्य दक्षिणां समर्पयामि।।
- त्यानंतर कापूर आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून हनुमानाची आरती करा.
- अशाप्रकारे पूजा केल्याने हनुमान अतिप्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हनुमान उत्पत्तीची कथा आणि पूजेचे सामान्य नियम...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.