हनुमानासमोर दिवा लावून करा या 1 मंत्राचा जप, दूर होऊ शकतो वाईट काळ
बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र, स्तुती आणि आरतीची रचना करण्यात आली आहे. यामधील काही मंत्राचा जप केल्यास व्यक्
-
बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्र, स्तुती आणि आरतीची रचना करण्यात आली आहे. यामधील काही मंत्राचा जप केल्यास व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार आम्ही तुम्हाला एक खास मंत्र सांगत आहोत. या मंत्राचा नियमितपणे विधिव्रत जप केल्यास हनुमान प्रसन्न होऊन भक्ताचा वाईट काळ दूर करू शकतात. येथे जाणून घ्या मंत्र आणि जप विधी...
मंत्र
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।
या विधीनुसार करावा मंत्र जप
1. रोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून एक लाल कपड्यावर हनुमानाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.2. हनुमानाला गुलाल, लाल फुल, नारळ अर्पण करावे. त्यानंतर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. जप पूर्ण होईपयंत दिवा चालू राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
3. त्यानंतर मंत्र काप सुरु करून कमीत कमी 5 माळ जप करावा.
4. दररोज जप करणे शक्य नसल्यास मंगळवारी आणि शनिवारी या मंत्राचा जप अवश्य करावा.