आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवे असेल चांगले आरोग्य, धन आणि सुख तर रोज दिवा लावताना करा या 1 मंत्राचा उच्चार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजन कार्यात दिवा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या पूजेमध्ये दिवा लावण्याची परंपरा आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, वास्तू शास्त्रामध्ये दिवा लावण्याच्या आणि ठेवण्याच्या संदर्भात विविध नियम सांगण्यात आले आहेत. वास्तू शास्त्रामध्ये दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यास त्याचे काय फळ मिळते याविषयीसुद्धा सांगण्यात आले आहे. दिवा लावताना खाली सांगण्यात आलेल्या मंत्राचा उच्चार अवश्य करावा.


मंत्र
दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:।
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते।।
शुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं सम्पदां।
शत्रुवृद्धि विनाशं च दीपज्योति: नमोस्तुति।।


या मंत्राचा उच्चार केल्याने होतात हे 3 फायदे
1. दिवा लावताना या मंत्राचा उच्चार केल्याने शत्रूंचा नाश होतो आणि घरात सुख-समृद्धी राहते.
2. या मंत्राचा उच्चार केल्याने आरोग्य चांगले राहते तसेच धन-धान्यामध्ये वृद्धी होते.
3.या मंत्राचा उच्चार केल्याने पापांचा नाश होतो आणि शुभफळांची प्राप्ती होते.


दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यास त्याचा काय फायदा होतो...
1- दिव्याची वात पूर्व दिशेला असल्यास आयुष्य वाढते.
2- दिव्याची वात पश्चिम दिशेला असल्यास दुःख वाढते.
3- दिव्याची वात उत्तर दिशेला असल्यास धनलाभ होतो.
4- दिव्याची वात दक्षिण दिशेला असल्यास नुकसान होते. हे नुकसान एखादा व्यक्ती किंवा धनाच्या स्वरुपात होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...