Home | Jeevan Mantra | Dharm | Hindu Worship perfect method mantra

पूजा करताना अनेकवेळा होतात चुका, या 1 मंत्र उच्चाराने दूर राहाल अशुभ प्रभावापासून

रिलिजन डेस्क | Update - Jul 25, 2018, 12:03 AM IST

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी-देवतेसाठी वेगवेगळी पूजा पद्धत सांगण्यात आली आहे. त्यानुसार पूजा केल्यास पूजेचे पूर्ण फळ म

 • Hindu Worship perfect method mantra

  हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी-देवतेसाठी वेगवेगळी पूजा पद्धत सांगण्यात आली आहे. त्यानुसार पूजा केल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते. धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेल्या काही पूजा पद्धती अत्यंत सोप्या तर काही अवघड आहेत. योग्य विद्वानच शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करू शकतात. अनेकवेळा पूजा करताना आपल्याकडून काही चुका होतात. अशावेळी काय करावे हे फार कमी लोकांना माहिती असावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, पूजा करताना एखादी चूक झाल्यास शेवटी येथे सांगण्यात आलेल्या मंत्राचा उच्चार करून चुकीसाठी क्षमा मागावी. यामुळे शुभफळ प्राप्त होऊ शकतात.


  मंत्र
  अपराधसहस्त्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया।
  दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर।।
  गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्रय मेव च।
  आगता: सुख-संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्।।


  अर्थ - हे परमेश्वरा, माझ्याकडून दिवस-रात्र हजारो अपराध होत राहतात. हा माझा दास आहे असे समजून माझ्या सर्व अपराधांसाठी तुम्ही मला कृपापूर्वक माफ करावे. तुमच्या दर्शनाने माझे पाप आणि दुःख नष्ट होऊन सुख-समृद्धी प्राप्त व्हावे. असे वरदान मला द्यावे.


  लक्षात ठेवा या गोष्टीही
  1. प्रत्येक पूजेच्या शेवटी या मंत्राचा उच्चार अवश्य करावा. यामुळे देवाची कृपा प्राप्त होऊ शकते.

  2. देवीची पूजा करत असाल तर परमेश्वर ठिकाणी परमेश्वरी म्हणावे.

  3. मंत्र जप केल्यानंतरही या मंत्राचा उच्चार करू शकता. कारण नकळतपणे आपल्याकडून एखादी चूक झालेली असते.

Trending