आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज या 4 पैकी कोणताही 1 उपाय केल्यास पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 19 जुलैला आषाढ मासातील गुप्त नवरात्रीची षष्ठी तिथी आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेले काम लवकर सिद्ध होऊ शकते. नवरात्र, बुधवार आणि सर्वार्थ सिद्धी योगामध्ये देवी दुर्गा तसेच श्रीगणेशाची विशेष पूजा करावी. श्रीगणेश पूजेने घरामध्ये सुख-समृद्धी वाढते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी बुध ग्रहासाठीसुद्धा पूजा केली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...


या विधीनुसार करावी श्रीगणेश पूजा...
श्रीगणेशाला गुलाल, चंदन, जानवे, दुर्वा, लाडू, मोदक अर्पण करावे. धूप-दीप लावावे. आरती करावी. पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा-


मंत्र - वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥


हा मंत्र उच्चार करणे शक्य नसल्यास श्री गणेशाय नम: मंत्राचा जप करावा.


बुधवारी हे उपायसुद्धा करू शकता 
> एखाद्या गणेश मंदिरात जाऊन श्रीगणेशाला 11 किंवा 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी.


> गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. शास्त्रानुसार गायीला पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे. गोमातेची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर नेहमी देवी-देवतांची कृपा राहते.


> एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात हिरवे मूग दान करावेत. मूग बुध ग्रहाशी संबंधित धान्य आहे. याचे दान केल्याने बुध ग्रहाचे दोष शांत होतात.

बातम्या आणखी आहेत...