Home | Jeevan Mantra | Dharm | How To Worship To Lord Krishna

श्रीकृष्ण धारण करतात वैजयंती माळ, तुम्हीही घातल्यास वाढू शकते आकर्षण

रिलिजन डेस्क | Update - Jul 17, 2018, 12:02 AM IST

भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावर मोरपंख असतो आणि श्रीकृष्ण एक खास प्रकराची माळ नेहमी धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची.

 • How To Worship To Lord Krishna

  भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावर मोरपंख असतो आणि श्रीकृष्ण एक खास प्रकराची माळ नेहमी धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि भागवत कथाकार पं. सुनील नागर यांच्यानुसार शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णाला 6 गोष्टी विशेष प्रिय आहेत. गाय, बासरी, मोरपंख, लोणी, खडीसाखर आणि वैजयंती माळ. मान्यतेनुसार ही माळ धारण केल्याने आकर्षण वाढते. येथे जाणून घ्या, वैजयंती माळेशी संबधित काही खास गोष्टी...


  1. मान्यतेनुसार, जो व्यक्ती वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला सुख-समृद्धी आणि धन-संपत्ती प्राप्त होते.


  2. वैजयंतीची माळ कोणत्याही सोमवार आणि शुक्रवारी धारण करू शकता. धारण करण्यापूर्वी गंगाजल किंवा शुभ पाण्याने धुवून घ्यावी.


  3. ज्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल त्यांनी ही माळ धारण करावी. स्वतःवरील विश्वास वाढेल.


  4. मनाची अशांती दूर करण्याची इच्छा असल्यास ही माळ धारण केल्याने मानसिक शांती प्राप्त होते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

 • How To Worship To Lord Krishna

  5. वैजयंती एक वृक्ष आहे. या झाडाला लागणारी फुले पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात.

 • How To Worship To Lord Krishna

  6. हे फुल गुच्छ रूपात असतात. फुलांसोबतच छोटे-छोटे दाणे (बिया) असतात. हे दाणे खूप कडक असतात. या दाण्यांमध्ये छिद्र पाडून माळ तयार केली जाते. 

Trending