आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवलिंगावर अर्पण करू नये हळद आणि शंखाने जल, वाचा पुजेशी संबंधित 10 खास नियम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू घरांमध्ये रोज देवी-देवतांची पूजा करण्याचे विधान आहे. पूजा-पाठ हे हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. आपल्या दाहरम ग्रंथांमध्ये देवतांच्या पुजेशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला पुजेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.


1. महादेवाला कधीही शंखाने जल आणि हळद अर्पण करू नये. शास्त्रानुसार हे दोनी काम शिव पूजेत वर्ज्य आहेत. 


2. सूर्यदेव, श्रीगणेश, दुर्गा, शिव आणि विष्णुला पंचदेव म्हटले जाते. सुखाची इच्छा ठेवणा-या प्रत्येक मनुष्याला या पाच देवांची पुजा अवश्य केली पाहिजे. कोणत्याही शुभ कार्याअगोदर यांची पूजा करणे गरजेचे आहे.


3. महादेवाच्या पूजेत कधीच केतकीच्या फूलांचा वापर करु नये. सूर्यदेवाच्या पूजेत कधीच अगस्त्यचे फूल चढवू नये. गणपतीच्या पूजेत तुळशी कधीच अर्पण करु नये.


4. वायू पुराणानुसार जो व्यक्ती स्नान न करता तुळशीचे पान तोडून देवाला अर्पण करतो अशा पूजेचा देव स्वीकार करत नाहीत. सकाळी स्नान केल्यानंतर जो व्यक्ती देवतांसाठी स्वतः फुलं तोडून ते अर्पित करतो, देवगण त्या फुलांचा प्रसन्नतेने स्वीकार करतात. 


5. देवी-देवतांसमोर तूप आणि तेल, हे दोन्ही दिवे लावावेत. तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवस उजव्या बाजूला लावावा.


पुजेशी संबंधित इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...