आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्ण पूजेमध्ये लक्षात ठेवा या 6 गोष्टी, दूर होईल दुर्भाग्य आणि वाढेल सुख-समृद्धी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अधिक मास चालू आहे. या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या महिन्यात भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांची मनोभावे सेवा केल्यास दुर्भाग्य दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये येथे सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.


1. हस्त प्रक्षालन
पूजेपूर्वी भगवान श्रीकृष्णाचे हात पाण्याने धुण्याची क्रिया, यामध्ये उपयोगात येणाऱ्या पाण्याला आचमनीय म्हणतात. हे शुद्ध जल आणि सुगंधित फुलांचे मिश्रण असते.


2. आसन
भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचे ठरते आसन, ज्यावर श्रीकृष्णाची स्थापना केली जाते. याच रंग डार्क आणि चमकदार म्हणजे लाल, पिवळा, नारंगी असावा.


3. पाद्य
ज्या भांड्यामध्ये श्रीकृष्णाचे पाय धुतले जातात त्याला पाद्य म्हणतात. पूजेपूर्वी पाद्यमध्ये स्वच्छ पाणी फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात आणि या मिश्रणाने श्रीकृष्णाचे चरण धुवावेत.


4. पंचामृत
दूध, दही, तूप, मध आणि साखर मिसळून पंचामृत तयार करावे. यामध्ये तुळशीचे पाने टाकून श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवावा. तुळस न टाकलेला नैवेद्य श्रीकृष्ण ग्रहण करत नाहीत.


5. पंचोपचार
पूजेमध्ये वापरण्यात येणारे चंदन, कुंकू, तांदूळ, अबीर, सुगंधित फुल आणि शुद्ध पाण्याला पंचोपचार किंवा अनुलेपन म्हटले जाते. श्रीकृष्ण पूजेत या सर्व गोष्टींचा उपयोग आवश्यक आहे.

 

6. नैवेद्य
भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये ताजे फळ, मिठाई, लाडू, लोणी-खडीसाखर आणि तुळशीचे पाने अवश्य टाकावीत.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...