आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही किंवा तुमची पत्नी पिंपळाच्या झाडाची पूजा करत असल्यास लक्षात ठेवा या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचेच स्वरूप असल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते. या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. येथे जाणून घ्या, पिंपळाच्या झाडाचा सामान्य पूजन विधी आणि काही खास उपाय....


अशा पद्धतीने करा पूजा -
पिंपळाची पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हावे. पूजेच्या सुरुवातीला पिंपळाच्या झाडाला गायीचे दुध, तीळ आणि चंदन मिश्रित पाणी अर्पण करा. जल अर्पण केल्यानंतर यज्ञोपवीत (जानवे), फुल, नैवेद्य आणि इअतर पूजन सामग्री अर्पण करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे धूप-दीप दाखवून दिवा अवश्य लावावा. आसनावर बसून किंवा उभे राहून मंत्र जप करावा.


मंत्र-
मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे। अग्रत: शिवरूपाय वृक्षराजाय ते नम:।।
आयु: प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्वसम्पदम्। देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गत:।।


या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केला जाऊ शकतो. जप केल्यानंतर आरती करावी. पिंपळाला अर्पण केलेल्या पाण्याधील थोडे पाणी घरात शिंपडावे. अशाप्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांतता कायम निवास करते.


पिंपळाच्या झाडाशी संबंधित इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...