आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच घरातून काढून टाका हनुमानाचे असे फोटो, अन्यथा होत राहील नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या शनिवारी 31 मार्चला चैत्र मासातील पौर्णिमा आणि हनुमान जयंती आहे. शनिवार आणि हनुमान जयंतीच्या शुभ योगात पूजापाठ आणि ज्योतिषीय उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होऊ शकतात. कलियुगात हनुमान सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले गेले आहेत, यामुळे बहुतांश लोक बजरंगबलीचा फोटो घरात अवश्य लावतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हनुमानाचे काही फोटो घरामध्ये लावू नयेत. येथे जाणून घ्या, हनुमानाच्या फोटोशी संबंधित काही खास गोष्टी...


हनुमानाचे कोणते फोटो घरामध्ये लावू नयेत...
1. युद्ध करत असलेल्या हनुमानाचा फोटो घरामध्ये लावू नये. असा फोटो घरामध्ये लावल्यास मानसिक तणाव वाढू शकतो आणि विचार आक्रमक होतात. विचारांच्या आक्रमकतेमुळे गडबडीत केहाडे काम चुकीचे होऊ शकते. यामुळे घरामध्ये असा फोटो लावण्यापासून दूर राहावे.


2. लंका दहन करत असलेल्या हनुमानाचा फोटोही घरात लावू नये. असा फोटो घरात असल्यास स्वभावातील क्रोध वाढतो, कारण या फोटोमध्ये हनुमानाचे रौद्र रूप दिसते. अशा स्वरूपाचे दर्शन केल्याने आपल्या स्वभावातील क्रोध वाढू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हनुमानाचे कोणते फोटो घरात लावल्याने काय फायदा होतो...