आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 दिवस अशाप्रकारे उपवास केल्यास नष्ट होईल दुर्भाग्य, उजळेल भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वामन पुराणाच्या अथ द्विषष्टितमोध्यायमध्ये सांगण्यात आलेल्या एका प्रसंगामध्ये देवी-देवता आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये झालेल्या विविध प्रश्न-उत्तरांचे वर्णन करण्यात आले आहे. या गोष्टी मनुष्य जीवन यशस्वी बनवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी सहायक ठरू शकतात.


श्लोक नं 16 आणि 17 मध्ये स्वतः श्रीविष्णू यांनी उपवासाची एक खास पद्धत सांगितली आहे. जो व्यक्ती या पद्धतीनुसार 12 दिवस उपवास करतो त्याला सर्व दुःखातून मुक्ती मिळू शकते. अशाप्रकारे उपवास करणाऱ्या व्यक्तीवर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्याचा वाईट काळ दूर करतात.


श्लोक-
त्र्यहमुष्णं पिबेदाप: त्र्यहमुष्णं पय: पिबेत्। त्र्यहमुष्णं पियेत्सर्पिर्वायुभक्षो दिनत्रयम्।।
एला द्वादश तोयस्य पलाष्टौ पयस: सुरा: ।षट्पलं सर्पिष: प्रोत्तं दिवसे दिवसे पिबेत्।।


अर्थ-
जो व्यक्ती 12 दिवस या उपवास विधीचे पालन करतो, त्याला मनासारखे फळ प्राप्त होते. उपवासाच्या पहिले तीन दिवस केवळ गरम पाणी प्यावे. त्यानंतर तीन दिवस फक्त गरम दुधाचे सेवन करावे. त्यानंतर तीन दिवस गरम तूप खाऊन दिवस काढावेत आणि शेवटच्या द्विभाषी निराहार राहून उपवास करावा.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...