आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विधीनुसार करा होलिका दहन, घरात कधीच कमी पडणार नाही धन-धान्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्या (1 मार्च, गुरुवार) रात्री होळीचे दहन केले जाईल. होळी दहनापूर्वी महिला होळीची पुजा करतात. होळीची पुजा केल्याने घरात सुख-शांती तसेच पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तसेच धन-धान्याची कधीच कमतरता जाणवत नाही. असा आहे होळी पुजनाचा विधी.


आवश्यक सामग्री-रांगोळी, तांदूळ, फूल, हळकुंड, मुग, बत्ताशे, नारळ, इत्यादी


पुजेचा विधी
एका ताटामध्ये पुजेसाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री घ्यावी. सोबत एक पाण्याचा भरलेला तांब्या घेऊन होळीचे दहन ज्या ठिकाणी केले जाणार आहे तेथे खाली दिलेल्या मंत्राचा जप करत स्वत:वर व पुजेच्या सामग्रीवर थोडे-थोडे पाणी शिंपडत जावे -


ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु,
ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु,
ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु।


वरील मंत्राचा जप झाल्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी, तांदूळ, फूल आणि दक्षिणा घेऊन खाली दिलेल्या मंत्राचा उच्चार करावा -


ऊं विष्णु: विष्णु: विष्णु: श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया अद्य दिवसे कीलक नाम संवत्सरे संवत् 2072 फाल्गुन मासे शुभे शुक्लपक्षे पूर्णिमायां शुभ तिथि --गोत्र (स्व गोत्राचा उच्चार करावा) उत्पन्ना--(जन्मनावाचा उच्चार) मम इह जन्मनि जन्मान्तरे वा सर्वपापक्षयपूर्वक दीर्घायुविपुलधनधान्यं शत्रुपराजय मम् दैहिक दैविक भौतिक त्रिविध ताप निवृत्यर्थं सदभीष्टसिद्धयर्थे प्रह्लादनृसिंह होली इत्यादीनां पूजनमहं करिष्यामी।


गणेश-अंबिका पूजन
हातामध्ये फुल व तांदूळ घेऊन श्री गणेशाचे ध्यान करावे -
ऊं गं गणपतये नम: आह्वानार्र्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
गणपतीला फुल, कुंक आणि अक्षता समर्पित कराव्यात
ऊं अम्बिकायै नम: आह्वानार्र्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि सर्मपयामि।।
देवी अंबिकेचे ध्यान करत पंचोपचार पूजेसाठी गंध, तांदूळ फूल अर्पण करावे.
ऊं नृसिंहाय नम: आह्वानार्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
भगवान नृसिंहाचे ध्यान करत पंचोपचार पूजेसाठी गंध, तांदूळ फूल अर्पण करावे.
ऊं प्रह्लादाय नम: आह्वानार्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
प्रह्लादाचे स्मरण करत मनोभावे नमस्कार करून गंध, तांदूळ फूल अर्पित करावे.


आता खाली दिलेल्या मंत्राचा उच्चार करत दोन्ही हात जोडून उभे राहून मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी -
असृक्पाभयसंत्रस्तै: कृता त्वं होलि बालिशै: अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव:।।


मंत्राचा उच्चार झाल्यानंतर गंध, अक्षदा, फुल, पूर्ण मुग, संपूर्ण हळकुंड, नारळाला कच्चे सुत बांधून होळीसमोर ठेवावे आणि हात जोडून होळीला तीन, पाच अथवा सात प्रदक्षिणा घालाव्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, होळीला अर्पित करण्यात येणा-या सामग्रीचे महत्त्व...

बातम्या आणखी आहेत...