आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी अवश्य करावी पंचमुखी हनुमानाची पूजा, होतील हे 5 खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. शनीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी आणि घरातील अमंगल नष्ट करण्यासाठी हनुमानाची पूजा केली जाते. तुम्हालाही तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्याची इच्छा असल्यास मंगळवारी पंचमुखी हनुमानाची पूजा करणे सुरु करा. हनुमानाचा हा एक दुर्लभ अवतार आहे. हा अवतार यांनी रावणाचा भाऊ अहिरावणला मारण्यासाठी घेतला होता.


पंचमुखी हनुमानाची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवल्यास घरातील विविध वास्तुदोष आपोआप दूर होऊ लागतात. हनुमानाच्या पंचमुखी अवतारामध्ये पहिले मुख वानर, दुसरे गरुड, तिसरे वराह, चौथे हयग्रीव्ह (घोडा) आणि पाचवे नृसिंहचे आहे. या पाच मुखांनी हनुमान भक्ताच्या जीवनातील पाच प्रकारच्या अडचणी नष्ट होतात. प्रत्येक मुखाचे एक खास आणि वेगळे महत्त्व आहे.


पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखांचे महत्त्व 
1 - मूर्तीच्या पहिल्या वानर मुखाने सर्व शत्रूंवर विजय प्राप्त होतो.
2 - दुसऱ्या गरुड मुखाने सर्व अडथळे आणि अडचणींचा नाश होतो.
3 - तिसऱ्या उत्तर दिशेच्या वराह मुखाने दीर्घायुष्य, प्रसिद्धी आणि शक्ती मिळते.
4 - चौथ्या दिशेच्या नृसिंह मुखाने भीती, तणाव आणि अडचणी दूर होतात.
5 - मूर्तीच्या पाचव्या अश्व मुखाने सर्व इच्छा पूर्ण होतात. 


पुढे वाचा, कशाप्रकारे करावी पंचमुखी हनुमानाची पूजा...

बातम्या आणखी आहेत...