आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळवार रात्रीपूर्वी हनुमानाला अर्पण करा या 7 गोष्टी, वाढू शकते इन्कम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामचरितमानसनुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला होता आणि याच कारणामुळे मंगळवारी यांची विशेष पूजा केली जाते. मान्यतेनुसार कलियुगात हनुमानाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होते. बजरंगबलीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार हनुमानाला कोणकोणत्या गोष्टी अर्पण केल्याने धन संबंधित अडचणीत दूर होऊ शकतात.


1. शेंदूर आणि चमेलीचे तेल
शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करून हनुमानाचा शृंगार केला जातो.


2. गुलाबाचे फुल 
देवी-देवतांच्या कृपा प्राप्तीसाठी त्यांना पुष्पहार अर्पण करणे श्रेष्ठ विकल्प मानला जातो.


3. पान
हनुमानाला गोड बनारसी पण अर्पण करावे. यामध्ये लवंग अवश्य टाकावी.


4. धूप-दीप
हनुमानासमोर धूप-दीप लावल्याने सर्व देवतांची कृपा लवकर प्राप्त होऊ शकते.


5. नारळ 
प्रत्येक पूजन कार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे. यामुळे हनुमानालाही नारळ अर्पण करावे.


6. पाच प्रकारचे फळ
पूजेमध्ये फळ अर्पण करण्याची विशेष प्रथा आहे. हनुमानाला मंगळवारी पाच प्रकारचे फळ अर्पण करावेत.


7. मिठाई
हनुमानाला मिठाईसुद्धा अर्पण करावी. मिठाई अर्पण केल्याने सर्व देवी-देवता प्रसन्न होतात.

बातम्या आणखी आहेत...