आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 मेच्या विशेष योगामध्ये स्नान करताना करा 1 खास उपाय, मिळेल गंगास्नानाचे पुण्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात गुरुवार 24 मे रोजी गंगादशहरा आहे. पंचांगानुसार अधिक मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. मान्यतेनुसार, प्राचीन काळी या तिथीला राजा भागीरथ यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरित झाली होती. गंगेत डुबकी लावल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य मिळते असे मानले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, स्कंद पुराणामध्ये गंगा दशहराचे अधिक महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी पवित्र नदी गंगामध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची प्रथा आहे. येथे जाणून घ्या, या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करणे शक्य नसल्यास घरातच स्नान करून कशाप्रकारे पुण्य प्राप्त करू शकता...


# अधिक मासामुळे जुळून आला दुर्लभ योग
सध्या अधिक मास चालू असून हा महिना 3 वर्षातून एकदा येतो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या महिन्यात अधिक मास येतो. यावेळी ज्येष्ठ मासात आला आहे. यामुळे गंगा दशहराचे महत्त्व अधिक वाढले आहे.


# घरातच स्नान करताना करा गंगा नदीचे स्मरण 
गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करताना गंगा नदीचे ध्यान करावे. स्नान करताना खालील मंत्राचा उच्चार करावा.
स्नान मंत्र- गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु।।


या मंत्राचा उच्चार करत स्नान केल्यास तीर्थ स्नानाचे पुण्य मिळते. 


पुढे वाचा, गंगा दशहराच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टींचे दान करू शकता..

बातम्या आणखी आहेत...