आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगन्नाथ मंदिरात विश्वासातील सर्वात मोठे किचन, 800 लोक बनवतात 56 भोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगन्नाथ मंदिरातील प्रसादाला महाप्रसाद मानले जाते. भगवान जगन्नाथ यांच्या प्रसादाला महाप्रसादाचे स्वरूप महाप्रभु वल्लभाचार्य यांच्यामुळे मिळाले. मान्यतेनुसार महाप्रभु वल्लभाचार्य यांच्या निष्ठेची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या एकादशी व्रताच्या दिवशी ते मंदिरात आल्यानंतर कोणीतरी त्यांना प्रसाद दिला. महाप्रभु यांनी प्रसाद हातामध्ये घेऊन देवाचे स्तवन सुरु केले आणि यामध्ये दिवस-रात्र उलटून गेले. दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्तवन समाप्त झाल्यानंतर त्यांनी प्रसाद ग्रहण केला आणि त्या प्रसादाला महाप्रसादाचे गौरव प्राप्त झाले.


1. जगन्नाथ मंदिराचे एक मोठे आकर्षण येथील स्वयंपाकघर आहे. हे किचन विश्वातील सर्वात मोठे स्वयंपाकघर मानले जाते. हे मंदिराच्या दक्षिण-पूर्व दिशेला स्थित आहे. या किचनमध्ये भगवान जगन्नाथ यांच्यासाठी नैवेद्य तयार केला जातो.


2. या विशाल स्वयंपाकघरात देवाला अर्पण करण्यात येणार महाप्रसाद तयार करण्यासाठी जवळपास 500 आचारी आणि त्यांचे 300 सहकारी काम करतात. मान्यतेनुसार या स्वयंपाकघरात जो कोणता प्रसाद तयार केला जातो, ते सर्व काम देवी लक्ष्मीच्या निगराणीमध्ये होते.
 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...