आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन लाभासाठी आज करा श्रीविष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (10 जून, रविवार) अधिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथी विशेष मानली जाते परंतु अधिक मासातील एकादशीचे महत्त्व अधिक मानले गेले आहे. अधिक मासातील दोन्ही पक्षातील एकादशीला कमला एकादशी म्हटले जाते. या तिथीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, व्रत विधी...


व्रत विधी...
एकादशीला सकाळी लवकर उठून एखाद्या पवित्र नदी किंवा तलावावर जाऊन शेण, माती, तीळ, कुश आणि आवळ्याच्या चूर्णाने स्नान करावे. त्यानंतर मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाची धूप-दीप, नैवेद्य, फुल, केशर अर्पण करून पूजा करावी. या दिवशी पाणी न पिता व्रत ठेवावे. हे शक्य नसल्यास केवळ पाणी पिऊन किंवा फळ खाऊन व्रत करावे.


प्रत्येक प्रहर (सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यँत प्रत्येक 3 तासांनी) भगवान विष्णू-लक्ष्मी आणि महादेव-पार्वतीची पूजा करावी. पहिल्या प्रहरात देवाला नारळ, दुसऱ्या प्रहरात बेलाचे फळ, तिसऱ्या प्रहरात सीताफळ आणि चौथ्या प्रहरात सुपारी अर्पण करावी. त्यानंतर रात्रभर जागरण करून मंत्र जप करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी (11 जून, सोमवार) स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना जेवण आणि दक्षिण देऊन तृप्त करावे. अशाप्रकारे जो व्यक्ती कमला एकादशीचे व्रत करतो, तो या लोकात सर्व सुख भोगून शेवटी भगवान विष्णूंच्या धाममध्ये जातो.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, उपाय...

बातम्या आणखी आहेत...