आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 मे : अधिक मासातील पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली लावावा दिवा, होईल धन लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अधिक मास चालू असून, 29 मे बुधवारी या मासातील पौर्णिमा आहे. अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. यामुळे या महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. कारण यानंतर ही पौर्णिमा 3 वर्षांनंतर 2021 मध्ये येईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अधिक मासातील पौर्णिमेला पवित्र   नदीमध्ये स्नान करण्याचे आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही ही पौर्णिमा अत्यंत खास आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास, भाग्याची साथ मिळू शकते.


या दिवशी करावेत हे उपाय...
1. पौर्णिमेच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आर्थिक फायदा करून देणारे योग जुळून येतात.


2. पौर्णिमा तिथीचे स्वामी चंद्रदेव आहेत. यामुळे या दिवशी चंद्राची पूजा करावी. पौर्णमीच्या संध्याकाळी चंद्रदेवाला खीर नैवेद्य दाखवावी. यामुळे दुर्भाग्य दूर होऊ शकते.


3. चंद्रमा महादेवांच्या मस्तकावर विराजित आहे. यामुळे या दिवशी महादेवाचा अभिषेक गायीच्या कच्च्या दुधाने (गरम न केलेल्या) करावा. या उपायाने धन लाभाचे योग जुळून येऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 2 उपाय...

बातम्या आणखी आहेत...