आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 पौराणिक पुस्तकांमध्ये सांगण्यात आले आहेत बेडरूममध्ये बेड ठेवण्याचे नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कंद आणि ब्रह्म पुराणासहित 2 संहिता ग्रंथ आणि इतर 3 पुराणांमध्ये पलंग (शैय्या)शी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींकडे लक्ष दिल्यास आजार होत नाहीत आणि वय वाढते. यासोबतच शैय्या दोष लागत नाही. यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत. यामध्ये पलंगाची योग्य दिशा आणि स्थान कोणते आहे, कोणत्या लाकडाचा पलंग असावा आणि इतरही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 


1. लघुव्यास संहितानुसार पलंगासमोर आरसा असू नये. आरशामध्ये बेड दिसत असल्यास त्या बेडवर झोपणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्य आणि रिलेशनवर निगेटिव्ह प्रभाव पडतो. या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पलंग आणि आरसा या स्थितीमध्ये असणे अशुभ सांगण्यात आले आहे.


2. स्कंद आणि ब्रह्म पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की कोणत्या ठिकाणी झोपू नये. या ग्रंथांनुसार पलंगाच्या बरोबरीने खिडकी असणे शुभ राहते. झोपेतून उठताच आकाशाचे दर्शन व्हावे यासाठी सकाळी थोडावेळ खिडकी उघडी ठेवावी. यामुळे आळस, थकवा आणि श्वसनाचे आजार होत नाहीत.


3. श्रीविष्णू आणि वामन पुराणानुसार तुमच्या पलंगाचे हेडर पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे. या दिशेला डोके करून झोपल्याने पैसा आणि आयुष्य वाढते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार गोष्टींविषयी...

बातम्या आणखी आहेत...