आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपत्य सुखाची इच्छा असल्यास चतुर्थीला करा श्रीगणेशाच्या या स्वरूपाची पूजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 3 मे रोजी वैशाख मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. या दिवशी भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीचे व्रत केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास श्रीगणेश भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. 


अपत्य प्राप्तीसाठी उपाय 
तुम्हाला अपत्य प्राप्तीची इच्छा असल्यास घरामध्ये श्रीगणेशाच्या बाल स्वरूपाची पूजा करावी. या उपायाने तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.


पूजन विधी 
चतुर्थी तिथीला सकाळी स्नान केल्यानंतर भगवान श्रीगणेशाच्या बाल स्वरूपाची पूजा करावी. दुर्वा आणि लाल फुल अर्पण करावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा पन्ना (रत्न)च्या माळेने जप करावा.


मंत्र- ऊं श्रीं ह्रीं क्लीं गणेश्चराय ब्रह्मरूपाय चारवे।
सर्वसिद्धिप्रदेशाय विघ्नेशाय नमो नम:।।
(ब्रह्मवैवर्तपुराण, गणपतिखण्ड 13/32)


पुढील स्लाईडवर वाचा, तल्लख बुद्धिसाठी उपाय...

बातम्या आणखी आहेत...