आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 एप्रिलला सोमवती अमावास्या : 17 वर्षांनंतर जुळून येत आहे शुभ संयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 16 एप्रिल 2018 ला सोमवती अमावस्या आहे. या वर्षी सोमवती अमावास्येला सूर्य-चंद्र मेष राशी आणि अश्विनी नक्षत्रामध्ये राहतील. वैशाख मास आणि अश्विनी नक्षत्राचा संयोग 17 वर्षांनंतर जुळून येत आहे. यानंतर असा शुभ संयोग 10 वर्षांनंतर 24 एप्रिल 2028 मध्ये जुळून येईल. सात्विक आणि देवगण असलेल्या या नक्षत्रामध्ये सोमवार आणि अमावस्या योग जुळून आल्यामुळे हा दिवस पितृ पूजा, पितृ दोष आणि कालसर्प दोष शांतीसाठी अत्यंत खास राहील.


हिंदू धर्मामध्ये या अमावास्येला अत्यंत खास मानले जाते. विवाहित स्त्रियांनी या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करावे. पुराणानुसार या दिवशी मौन  (कोणाशीही काहीही न बोलता) राहून व्रत केल्याने सहस्त्र गोदान (हजार गायींचे दान)चे फळ मिळते. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या अमावस्येविषयी इतरही खास गोष्टी आणि उपाय...

बातम्या आणखी आहेत...