आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 कारण, ज्यामुळे कमी होत आहे मनुष्याचे आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारतानुसार मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे निश्चित करण्यात आले आहे, परंतु कोणताही मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. फार कमी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जगतात. महाभारतातील एक प्रसंगानुसार, राजा धृतराष्ट्र महात्मा विदुरला मनुष्याचे आयुष्य कमी होण्यामागचे कारण विचारतात. तेव्हा विदुर मनुष्याचे आयुष्य कमी करणार्‍या 6 दोषांची माहिती राजा धृतराष्ट्रला सांगतात. महाभारतानुसार यमदेवानेच शाप मिळाल्यामुळे मनुष्य बनून विदुराच्या रुपात जन्म घेतला होता. महात्मा विदुराने राजा धृतराष्ट्रला मानुशायचे आयुष्य कमी करणारे 6 दोष सांगितले.


धृतराष्ट्र महात्मा विदुरला विचारतात -
शतायुरुक्त: पुरुष: सर्ववेदेषु वै यदा।
नाप्नोत्यथ च तत् सर्वमायु: केनेह हेतुना।। (महाभारत, उद्योग पर्व 37/9)


अर्थ -सर्व वेदांमध्ये मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे सांगितले आहे. तर मग कोणत्या कारणामुळे मनुष्य स्वतःचे आयुष्य पूर्ण जगू शकत नाही.


विदुर सांगतात की -
अतिमानोअतिवादश्च तथात्यागो नराधिप।
क्रोधश्चात्मविधित्सा च मित्रद्रोहश्च तानि षट्।।
एत एवासयस्तीक्ष्णा: कृन्तन्यायूंषि देहिनाम्।
एतानि मानवान् घ्नन्ति न मृत्युर्भद्रमस्तु ते।।
(महाभारत, उद्योगपर्व 37/10-11)


अभिमान-
विदुराने राजा धृतराष्‍ट्राला सांगितले की, जे लोक अत्यंत अभिमान, अंहकारी असतात ते कधीच शंभर वर्षे जगत नाहीत. अहंकार मानसातला चांगुलपणा संपवतो. यामुळे शारीरिक अशक्‍तपणा निर्माण होतो. अंहकारामुळे चांगले आणि वाईट यामधले आंतर कमी होते. यामुळे वाईट मार्गाला अहंकारी व्‍यक्ति जातात.


जास्‍त बडबड करणे-
जे लोक विनाकारण जास्‍त‍ बडबड करतात, शांत बसु शकत नाहीत, अशा लोकांचा मृत्‍यु लवकर होतो. जास्‍त बोलल्‍यामुळे शरिरातील उर्जा कमी होते. जर आपण कामापुरतेच बोललो तर शरिरातील उर्जा कमी खर्च होते. आयुष्‍य वाढते, असे विदुर नितीमध्‍ये सांगितले आहे.


पुढे जाणून घ्या, इतर चार गोष्टींविषयी...

बातम्या आणखी आहेत...