आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजेपूर्वी करावा या 1 मंत्राचा उच्चार, यामुळे घरात येते सुख-समृद्धी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये पूजा-पाठशी संबंधित विविध प्रथा आहेत. परंतु यामधील काही प्रथा वैदिक काळापासून चालत आलेल्या आहेत. जे लोक पूजन कर्मामध्ये विश्वास ठेवतात, रोज आरती करतात त्यांच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, प्रत्येक पूजेमध्ये स्वस्तिवाचन आवश्यक आहे. हा मंगल पाठ सर्व देवी-देवतांना जागृत करतो.


स्वस्तिवाचनचे महत्त्व 
स्वस्तिक मंत्र किंवा स्वस्ति मंत्र शुभ आणि शांतीसाठी उपयुक्त ठरतो. स्वस्ति = सु + अस्ति = कल्याण हो. मान्यतेनुसार यामुळे हृदय आणि मन एकत्र होते. मंत्रोच्चार करताना दुर्वा किंवा कुशाने पाणी शिंपडले जाते. यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते. स्वस्ति मंत्राचा पाठ करण्याची क्रिया 'स्वस्तिवाचन' नावाने ओळखली जाते.