आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जो व्यक्ती या विधीनुसार करतो पूजा, शनिदेव नेहमी करतात त्याचे रक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

30 डिसेंबरला शनी प्रदोष आहे. या दिवशी विधिपूर्वक शनी पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.पद्म पुराणातील उत्तर खंडात शनिदेवाने स्वतः राजा दशरथ यांना स्वतःचा पूजन विधी सांगितला होता. जो व्यक्ती या विधीनुसार माझी पूजा करेल मी त्याला कधीही कष्ट होऊ देणार नाही आणि त्याचे रक्षण करेल असेही सांगितले होते.


शनिदेवाने का दिले होते राजा दशरथला असे वरदान?
प्राचीन काळी अयोध्येचा राजा दशरथ यांना ज्योतिषांनी सांगितले की, शनिदेव कृत्तिका नक्षत्राच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचले असून आता ते रोहिणी नक्षत्राचे भेदन करून पुढे जातील. असे घडल्यास विश्वामध्ये 12 वर्षांपर्यंत भयंकर दुष्काळ पडेल. लोक पाणी आणि अन्नासाठी त्रस्त होतील. त्यानंतर राजा दशरथ यांनी खूप विचार केला आणि शेवटी दिव्यास्त्र घेऊन नक्षत्र मंडळात शनिदेवाशी युद्ध करण्यासाठी पोहोचले. राजा दशरथचे धाडस पाहून शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा राजा दशरथ यांनी शनिदेवाकडे जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आहेत तोपर्यंत तुम्ही रोहिणी नक्षत्राचे भेदन करणार नाहीत असे वरदान मागितले. तुम्ही देवता, असुर, मनुष्य, अपशू, पक्षी इ. कोणत्याही जीवाला दुःख देणार नाहीत असेही वाचन मागितले. त्यानंतर शनिदेवाने सांगितले की, जो विधिव्रत माझी पूजा करेल मी त्याला कधीही दुःख देणार नाही आणि त्याचे रक्षण करेल. अशाप्रकारे शनिदेवाकडून वरदान घेऊन राजा दशरथ पृथ्वीवर परत आले.


शनिदेवने राजा दशरथ यांना सांगितलेला पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...