आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलियुगाच्या 7 भविष्यवाणी : सर्व देवी-देवता पृथ्वी सोडून परत जातील स्वधाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकूण चार युग सांगण्यात आले आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. यामधील 3 युग समाप्त झाले असून कलियुगाचे जवळपास 5000 वर्ष पूर्ण झाले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कलियुग संदर्भात विविध भविष्यवाणी करण्यात आल्या आहेत. या पुराणात कलियुग केव्हा समाप्त होणार आणि पृथ्वीवर काय-काय घडणार याविषयी सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, यामधील 7 महत्त्वाच्या भविष्यवाणी...


1. कलियुग समाप्त होण्यापूर्वी सर्व देवी-देवता पृथ्वी सोडून स्वधाम परत जातील. मनुष्य पूजन-कर्म आणि सर्व धार्मिक काम करणे बंद करेल.


2. कलियुगाच्या अंतिम काळात मोठ्या धारेतून खूप वर्ष पाऊस पडत राहील, ज्यामुळे दाही दिशांना पाणीच पाणी जमा होईल. समस्त पृथ्वी जलमय होऊन प्राण्यांचा अंत होईल. त्यानंतर सूर्याची उष्णता तीव्र वाढेल आणि यामुळे पृथ्वी सुकून जाईल.


3. कलियुगात मनुष्याचे आयुष्य खूप कमी होईल. स्त्री आणि पुरुष दोघेही रोगी आणि कमी वयाचे असतील. 16 वर्षाच्या वयात लोकांचे केस पांढरे होतील आणि 20 वर्ष वयात वृद्ध होतील. तारुण्य समाप्त होईल.


4. कलियुगात संपूर्ण समाज हिंसक होईल. जे लोक बलवान असतील त्यांचे राज्य चालेल. माणुसकी नष्ट होईल. नाते संपुष्टात येतील. एक भाऊ दुसऱ्या भावाचा शत्रू होईल.


5. कलियुगातील सर्व लोक शास्त्रातील शिकवण विसरून जातील. चुकीच्या साहित्याची लोकांना आवड लागेल. लोक वाईट गोष्टी आणि सवयीच्या आधीन होतील.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर 2 भविष्यवाणी...

बातम्या आणखी आहेत...