आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या या खास गोष्टी माहिती नसतील तुम्हाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरी येथील विश्वप्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रेला (14 जुलै, शनिवार)सुरुवात झाली आहे. या रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ 16 चाकांच्या “नंदीघोष’ रथात, त्यांचे बंधू बलराम 14 चाकांच्या “तलध्वज’व देवी सुभद्रा 12 चाकांच्या “देवदलान’ रथात रीतसर पूजाअर्चा झाल्यानंतर स्वार झाले. रथयात्रा मुख्य मंदिरापासून सुरु होईल 2 किलोमीटर स्थित गुंडीचा मंदिरात समाप्त होईल. येथे भगवान जगन्नाथ 7 दिवस विश्राम करतील. आषाढ शुक्ल दशमी (22 जुलै, रविवार)ला रथयात्रा मुख्य मंदिरात परत पोहोचेल. या निमित्ताने आम्ही तुम्हाला या रथयात्रेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.


1. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ नारळाच्या लाकडापासून तयार केले जातात कारण हे लाकूड इतर लाकडांच्या तुलनेत हलके असते.


2. भगवान जगन्नाथ यांच्या रथाचा रंग लाल आणि पिवळा असून हा रथ इतर रथांपेक्षा आकाराने थोडा मोठाही असतो.


3. भगवान जगनाथ यांच्या रथाची विविध नवे आहेत, उदा. गरुडध्वज, नंदीघोष, कपिध्वज. रथाच्या सारथीचे नाव दारूक आहे.


4. भगवान जगन्नाथ यांच्या रथाच्या घोड्यांचे नाव बलाहक, शंख, श्वेत आणि हरीदाश्व आहे. रथाचे रक्षक पक्षिराज गरुड आहेत.


5. भगवान जगन्नाथ यांच्या रथावर हनुमान आणि नृसिंह यांचे प्रतीक चिन्ह तसेस सुदर्शनत स्तंभ असतो.


6. रथाचा ध्वज म्हणजे झेंडा त्रिलोक्यवाहिनी नावाने ओळखला जातो. रथ ज्या दोरखंडाने ओढला जातो, तो शंखचूड नावाने ओळखला जातो.


7. भगवान जगन्नाथ यांच्या रथाला 16 चाके असतात. उंची 13 मीटर. जवळपास 1100 मीटर कपड्याने रथाला झाकले जाते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...