आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी साजरी झाली पहिली ईद, जाणून घ्‍या रंजक बाबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पवित्र रमजान महिनाभर रोजे-उपवास ठेवल्‍यानंतर आणि ईश्‍वराची आराधना केल्‍यानंतर ईदचा च्रदं दिसल्‍यानंतर लोक एक दुस-याला चांद मुबारक म्‍हणून एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आणि पुढल्‍याच सकाळी नमाजनंतर (ईदचा इदगाह व मशिदीतील नमाज) एकमेकांना ईदच्‍या शुभेच्‍छा देतात. आणि थोरामोठ्यांचा आशिर्वाद घेतात. ईदच्‍या नमाजापूर्वी गरीबांना दान दिले जाते. 


इ.स. 624 मध्‍ये साजरी झाली पहिली ईद 
रमजानच्‍या महिन्‍यात उपवास ठेवणे हे कर्तव्‍य मानले गेलेले आहे. असे यासाठी की, व्‍यक्तिला भुक-तहान याची जाणीव व्‍हावी आणि तो लालसेपासून दूर राहून सत्‍याच्‍या मार्गावर चालावा. आपसातील तंटे-भांडणे मिटवून ईद-उल-फित्रचा सण पैगंबर मोहंम्‍मद यांनी ई.स. 624 मध्‍ये बदर येथील युद्धाच्‍या नंतर साजरा केला होता. या दिवशी नमाजापूर्वी त्‍यांनी गरीबांना काही दान दिले पाहीजे. हे प्रत्‍येक मुसलमानाचे कर्तव्‍य आहे, असे सांगितले होते. या दानास जकात-उल-फित्र देखील म्‍हणतात. ईद फक्‍त एक सण नाही तर ख-या अर्थाने स्‍वत:ला संतुलित करणे आणि समाजाला बरोबरीत, समान पातळीवर आणण्‍याची एक संधी आहे. संपुर्ण महिन्‍यात निघालेली जकात आणि खैरात प्रत्‍येकाच्‍या शरीरावर नवे कपडे आणणे, घरात उत्‍तमोत्‍तम पक्‍वान्‍न असणे आणि गरीब-श्रीमंत यातील फरक मिटवण्‍याची संधी आहे. यावरदेखील जर काही फरक राहीलाच तर ईदला प्रत्‍येकाची गाळाभेट घेऊन तो दर्जा बरोबरीचा करण्‍याची मोठी संधी असते. 


ईदच्‍या पूर्वी आणि चंद्रदर्शनानंतर द्या फितरा 
ईदचा चंद्र पाहिल्‍यानंतर आणि ईदची नमाज अदा होण्‍यापूर्वी फितरा दिला जाणे जरूरी आहे. फितरा याचा अर्थ रमजानदरम्‍यान जर कोणाकडून कमी-जास्‍त, चुकीने वा जाणेते-अजाणतेपणी एखादी चूक झाली असेल तर त्‍याची भरपाई होऊ शकते. फितरा म्‍हणजे जे काही धान्‍य आपण खातो, ते कुटुंबातील प्रत्‍येक व्‍यक्तिच्‍या डोक्‍यावरून उतरवून अडीच किलो व त्‍याच्‍या किमतीच्‍या बरोबरीचे रोख पैसे अशा लोकांना द्यावेत की जे अगदी गरजु आहेत. याचा हेतू असा की, ईदचा आनंद केवळ काही लोकांपूरताच मर्यादित न राहता सर्व गोरगरीबांनाही त्‍या  आनंदात सहभागी होता यावे. फितरा ईदच्‍या नमाजापूर्वी आणि ईदचा चंद्र दिसल्‍यानंतर दिला जातो. जर यापूर्वीच तो दिला गेला तर गरजु त्‍यास आधीच खर्च करून टाकतील आणि ईदच्‍या दिवशी पुन्‍हा रिकाम्‍या हाताने राहतील. ईदनंतर फितरा दिले तर त्‍याचा काही फायदा होणार नाही. म्‍हणून फितरा देण्‍याची एक निश्श्चित अशी वेळ आहे.  

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, ईदच्‍या दिवशी प्रत्‍येकाला असते ईदीची उत्‍कंठा... 

बातम्या आणखी आहेत...