Home | Jeevan Mantra | Dharm | know the information about chaturmaas four month

जाणून घ्या, चातुर्मासाच्या चारही महिन्यांचे महत्त्व, आयुष्य होईल सुखी

रिलिजन डेस्क | Update - Jul 28, 2018, 12:01 AM IST

आषाढी एकादशी (23 जुलै)पासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत भगवान विष्णू 4 महिने पाताळात शयन करतात.

 • know the information about chaturmaas four month

  आषाढी एकादशी (23 जुलै)पासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत भगवान विष्णू 4 महिने पाताळात शयन करतात. या चार महिन्यांना चातुर्मास असेही म्हणतात. चातुर्मास देवाच्या भक्तीचा काळ मानण्यात आला आहे. या दरम्यान कोणतेही मंगलकार्य केला जात नाहीत. या काळातच ही विविध व्रते का असावीत, यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत.


  आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मासास प्रारंभ होतो. यानंतर पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास नावाने ओळखले जाते. चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम महिना असा याचा शब्दश: अर्थ निघतो आणि याच कारणामुळे या चार महिन्यांत भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात. काही जण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात. काही जण जप-तप करतात, तर काही जण या चार महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात. या चार महिन्यांमध्ये लपलेल्या रहस्यांचे अध्ययन करणे गरजेचे आहे. यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल.


  श्रावणात गुरूंकडून जाणून घ्या योग्यता -
  चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्या. नियमांचे पालन करा. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच गुरुपौर्णिमा येते. वरील सर्व कार्य गुरूंच्या सान्निध्यात, त्यांच्या चरणाशी लीन होत, त्यांच्याकडून विद्या प्राप्त करत करायची असतात. याच महिन्यात रक्षाबंधनही येते. या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील. तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे?, कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरू करून देतील. आणि म्हणून तुलसीदास यांनी म्हटले आहे, ‘एहि कालिकाल न साधनदूजा. योग, यज्ञ, जप, तप, व्रत पूजा’. (तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप, तप, यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतील.)


  भाद्रपदात करा श्रेष्ठ कर्म -
  श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना येतो भाद्रपद. भाद्रपद (‘भद्र’ म्हणजे श्रेष्ठ आणि ‘पद’ म्हणजे पुढील वाटचाल) याचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे. याच महिन्यात कृष्णपक्षात श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. ‘कृ’ धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे. या महिन्यात आपली क्रियाशीलता वाढवत स्वत:ला सिद्ध करा. शुक्ल पक्षात गणेश चतुर्थी येते. गणेश पूजनात दूर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात. या आपल्याला त्यातील औषधीय गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात. श्रीमद्भगवतगीतेचे वाचन आणि श्रवण याच महिन्यात केले जाते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन महिन्यांचे महत्त्व...

 • know the information about chaturmaas four month

  अश्विन महिन्यात निरोगी जीवनाचे सार -
  चातुर्मासातील तिसरा महिना अश्विन. या महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असते. याचा गुरू अश्विनीकुमार आहे. त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले. महर्षी च्यवन यांच्याप्रमाणेच चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा. या महिन्यात प्रथम पक्ष श्राद्धपक्ष म्हणून ओळखले जाते. आपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महिना आहे. यानंतर येते ती नवरात्र. संयम अणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहे. या कालावधित मातृ शक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. (यापासूनच रात्र मोठी होण्यास आरंभ होतो.) जर आपण याचे तंतोतंत पालन केले तर विवेक शक्ती, ज्ञान-शक्ती आणि पराशक्ती जागृत होते. हाच ख-या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे. यात आपल्या आसुरी विचारांवर जय प्राप्त करत प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे पालन करू शकाल.

 • know the information about chaturmaas four month

  क्रियाशील कार्तिक महिना -
  चार्तुमासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिक. यात क्रियाशीलता वाढीस लागते. येणा-या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषिराजा याच महिन्यात करत असतो. समुद्र मंथनादरम्यान याच महिन्यात धन्वंतरी अमृत, अनेक रत्न आणि लक्ष्मी प्रगट झाली होती. नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात आनंद लुटला जातो. अशा प्रकारे गुरुकृपा, श्रेष्ठ आचरण, मनन, चिंतन, संयमी व्यवहार, उत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतो. यामुळे मानवातही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येईल. चतुर्मासाच्या या महिन्यात क्रियाशीलतेत वाढ होत असल्याने हा महिना ख-या अर्थाने मानवासाठी कसोटीचा महिना मानला जातो.

Trending