आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दान करून आनंद देणे म्हणजेच ईद, जाणून घ्‍या कशी करावी साजरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरबी भाषेतील शब्द आहे ईद-उल-फित्रा. ईदेचा अर्थच आनंद असून फित्रा म्हणजे दान करणे होय. ईद असे दान अाहे, ज्यात आनंद दिला जातो. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना फित्रा (दान) दिले जाते. रमजान इस्लामिक कॅलेंडरमधील ९ वा महिना आहे. यात सर्व मुस्लिम रोजे ठेवतात. ते पूर्ण झाल्याच्या आनंदात ईद साजरी केली जाते.

 

रमजानला इस्लाममध्ये उपासनेचा सर्वश्रेष्ठ महिना म्हटले गेले. बुखारी शरीफ यांच्या हदीस नं. 1793 नुसार सन 2 हिजरी म्हणजे 1448 वर्षांपूर्वी पैगंबरांनी आपल्या प्रजेला सांगितले होते की अल्लाहच्या हुकूमानुसार रोजे ठेवले जावेत. तीस दिवस उपाशी आणि तहानलेले राहून अल्लाहच्या उपासनेबरोबरच चांगली कामे करण्याचे बक्षीस म्हणजेच ईद होय. 

 

ईद आम्हाला या ४ गोष्टी शिकवते 
१. गरिबांना उत्पनातील २.५ टक्के हिस्सा द्या 

हदीसमध्ये म्हटले की जकात (दान) सन ४ हिजरीमध्ये सांगितली गेली. म्हणजे आपल्या मिळकतीतील २.५ % वाटा ईदपूर्वी गरिबांना देणे गरजेचे आहे. कुराणमध्ये सुरे बकरा सूूरत नं. २ आयत नं. ४३ मध्येही याचा उल्लेख आहे. 

 

२. एका दिवसाच्या मुलाच्या नावेही दान 
बुखारी शरीफ हदीस नं. १५०३ नुसार गरिबांना दान करा. हे दान एका ठराविक वजनानुसार धान्य किंवा त्याच्या सद्यकिमतीइतके पैसे प्रत्येक व्यक्तीला द्यावे लागतील. एका दिवसाच्या मुलाच्या नावेही वडिलांना दान द्यावे लागेल. 


३.चांगली वस्त्रे नेसा, दुसऱ्यांनाही द्या 
मोहंमद पैगंबर ईदला स्वत: चांगली वस्त्रे नेसत आणि दुसऱ्यांनाही चांगली वस्त्रे परिधान करण्यास सांगत. मिशकात शरीफ हदीस नं. १४२८ नुसार पैगंबरांनी म्हटले की, ईदच्या दिवशी गरिबांना कपडे आणि गरजेच्या वस्तू भेट द्या. 


४. काम करणाऱ्यांचा सन्मान केला जावा 
मिशकात शरीफ हदीस नं. १४३२ नुसार पैगंबरांनी आदेशित केले की, ईद सर्वांचीच आहे. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांसोबतही चांगले वर्तन करावे. इस्लाममध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कुराणामध्‍ये कोणत्‍या गोष्‍टी सांगितल्‍या आहेत गरजेच्‍या... 

 

बातम्या आणखी आहेत...