आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुले, मूर्ख आणि लोभी व्यक्तीसमोर करू नयेत प्रायव्हेट गोष्टी, अडचणी वाढतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी-कधी आपण नकळतपणे आपल्या प्रायव्हेट गोष्टी सर्वांसमोर बोलून जावोत आणि पुढे चालून यामुळे अडचणीत सापडतो. अनेकवेळा ही स्थिती गंभीर होते. महाभारताच्या तीर्थयात्रा पर्वामध्ये सांगण्यात आले आहे की, आपण कोणत्या 6 लोकांसमोर गुप्त गोष्टी करू नयेत. 


श्लोक
स्त्रियां मूढेन बालेन लुब्धेन लघुनापि वा।
न मंत्रयीत गुह्यानि येषु चोन्मादलक्षणम्।।


अर्थ-1. स्त्री, 2. मूर्ख, 3.लहान मुलं , 4. लोभी 5. नीच पुरुष 6.ज्यामध्ये उन्मादाचे लक्षण दिसत असेल अशा लोकांसमोर गुप्त गोष्टीची चर्चा करू नये.


1. स्त्री
स्त्रियांचा स्वभाव चंचल असतो. अनेकवेळा स्त्री एखादी अशी गोष्ट सर्वांसमोर बोलून जाते, ज्यामुळे कुटुंबाचा मान-सन्मान कमी होतो. स्त्रियांच्या बाबतीत असेही सांगितले जाते की, यांच्या पोटात कोणतीही गुप्त गोष्ट राहू शकत नाही. कधी न कधी कोणासमोर तरी गुप्त गोष्ट सांगूनच टाकतात. यामुळे स्त्रियांसमोर कधीही गुप्त गोष्टीची चर्चा करू नये.


2. मूर्ख
मूर्ख म्हणजे असा व्यक्ती ज्याला चांगले-वाईट, मित्र-शत्रू यामधील फरक कळत नाही. अशा लोकांसमोर जर आपण एखाद्या गुप्त गोष्टीची चर्चा केली तर कळत-नकळतपणे हे लोक इतरांसमोर आप्ळू गुप्त गोष्ट उघड करू शकतात. आपली एखादी गोष्ट आपल्या शत्रूला समजली तर आपण मोठ्या संकटात सापडू शकतो. यामुळे मूर्ख व्यक्तीससमोर कोणतीही गुप्त गोष्ट कार्य नये.


3. नीच पुरुष (वाईट काम करणारा)
जो पुरुष चोरी, लूट, चुकीचे काम, इतरांचे नुकसान करतात ते नीच पातळीचे असतात. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात. यामुळे अशा लोकांसोबत काही राहू नये आणि यांच्यासमोर आपली कोणतीही गुप्त गोष्ट उघड करू नये.


4. लोभी
जो व्यक्ती नेहमी धनाचा हव्यास करतो, तो स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणाचेही नुकसान करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तो कोणाचीही गुष्ट गोष्ट, इतर कोणत्याही व्यक्तीला धनाच्या हव्यासापोटी सांगू शकतो. मग तो तुमचा शत्रू का असेना. यामुळे लोभी व्यक्तीला कधीही स्वतःच्या गुप्त गोष्टी सांगू नयेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या दोन लोकांसमोर गुप्त गोष्टी करू नयेत...

बातम्या आणखी आहेत...