आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथामधून : या 7 गोष्टी कोठूनही मिळाल्या तरी लगेच घ्याव्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये मनुस्मृतीचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये आयुष्य सुखी आणि संस्कारी बनवणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महान महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या मदतीने केली अशी मान्यता आहे. मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेले काही खास सूत्र आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मान्सुस्मृतीमधील एका श्लोकामध्ये संग्नाय्त आले आहे की, आपण कोणकोणत्या सात गोष्टी संकोच न बाळगता घेण्याचा प्रयत्न करावा.


श्लोक
स्त्रियो रत्नान्यथो विद्या धर्मः शौचं सुभाषितम्।
विविधानि च शिल्पानि समादेयानि सर्वतः।।


अर्थ - जेथे कोठूनही किंवा कोणाकडूनही (चांगला किंवा वाईट व्यक्ती, चांगली किंवा वाईट जागा इत्यादी गोष्टींकडे लक्ष न देता) 1. सुंदर स्त्री, 2. रत्न, 3. विद्या, 4. धर्म, 5. पवित्रता, 6. उपदेश तसेच 7. विविध प्रकारचे शिल्प मिळत असेल तर, या गोष्टी कोणताही संकोच न बाळगता प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.


1. रत्न
रत्न विविध प्रकारचे असतात. उदा - मोती, पन्ना, माणिक, हिरा, पुष्कराज, नीलम. हे सर्व मौल्यवान रत्न आहेत. यामधील काही रत्न ग्रहदोष नष्ट करून शुभफळ प्रदान करतात. हिरा एक बहुमुल्य रत्न आहे, परंतु कोळशाच्या खाणीत आढळून येते. अशाचप्रकारे मोती समुद्राच्या तळाशी प्राप्त होतात. बारकाईने या गोष्टींचा विचार केल्यास, कोळशाची खान आणि समुद्र तळाला साफ-स्वच्छ ठिकाण तर म्हटले जाऊ शकत नाही, परंतु तरीसुद्धा येथून प्राप्त होणारे मौल्यवान रत्न आपण धारण करतो. यामुळे मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आले आहे की, रत्न कोणत्याही ठिकाणाहून मिळाले तरी ते घेण्यामध्ये संकोच बाळगू नये.

बातम्या आणखी आहेत...