Home | Jeevan Mantra | Dharm | longest lunar eclipse of the century today

5 कारण : ज्यामुळे सर्वात खास राहील या शतकातील आजचे चंद्रग्रहण

रिलिजन डेस्क | Update - Jul 27, 2018, 02:45 PM IST

आज रात्री (27 जुलै, शुक्रवार) खग्रास चंद्रग्रहण होईल. यासोबतच आज गुरु पौर्णिमासुद्धा आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल

 • longest lunar eclipse of the century today

  आज रात्री (27 जुलै, शुक्रवार) खग्रास चंद्रग्रहण होईल. यासोबतच आज गुरु पौर्णिमासुद्धा आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. चंद्रग्रहणाच्या दिवशी विविध अशुभ योगामुळे नैसर्गिक संकटाने नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या पाच कारणांमुळे हे ग्रहण सर्वात खास राहील.


  सर्वात मोठे ग्रहण
  हे ग्रहण 27 जुलै 2018 च्या रात्री जवळपास 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहण चालू होऊन 28 जुलै 2018 च्या पहाटे 3 वाजून 49 मिनिटांपर्यंत दिसेल. परंतु चंद्रावर ग्रहणाचा पूर्ण प्रभाव 1 तास 43 मिनिट राहील. संपूर्ण चंद्रग्रहण जवळपास 3 तास 55 मिनिट राहील.


  ब्लडमून
  या शतकातील सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण आज रात्री होईल. ग्रहण काळ 1 तास 43 मिनिटांपर्यंत चंद्र लाल दिसेल. यालाच ब्लडमून असेही म्हटले जाते.


  शनी आणि मंगळ वक्री
  गोचरमध्ये मकर राशीतील केतुसोबत चंद्राचा प्रभाव आणि राहुसोबत त्याचा समसप्तक दृष्टी संबंध यासोबतच शनी आणि मंगळाचे वक्री होणे एक विशेष घटना आहे. ग्रहणाच्या दिवशी अशाप्रकारचे अशुभ योग जुळून येणे, ज्योतिषीय दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. या ग्रहणामुळे नैसर्गिक संकट वाढण्याची शक्यता राहील. समुद्री वादळ येऊ शकते.


  यामुळे हे ग्रहण आहे सर्वात जास्त वेळ
  खगोल शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, 27 जुलैला चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीपेक्षा सर्वात जास्त अंतरात राहील. या स्थितीला लुनर एपोजी म्हणतात. पृथ्वी आणि चंद्रामध्ये जास्त अंतर असल्यामुळे हे ग्रहण जास्तवेळ चालेल. या शतकातील सर्वात छोटे चंद्रग्रहण 4 एप्रिल 2015 ला झाले होते. या ग्रहणाचा काळ 4 मिनिट 48 सेकंद होता. यानंतर 31 डिसेंबर 2028 मध्ये पूर्ण चंद्रग्रहण होईल.


  चार दिवसानंतर आणखी एक खगोलीय घटना
  31 जुलैला मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येईल. त्यावेळी दोन्ही ग्रहांमधील अंतर 5.76 किलोमीटर असेल. या दरम्यान लाल ग्रह दुप्पट मोठा दिसेल. दोन्ही ग्रह 15 वर्षांपूर्वी 2003 मध्ये जवळ आले होते. तेव्हा यांच्यामधील अंतर 5.57 कोटी किलोमीटर होते. यानंतर हे दृश्य 6 ऑक्टोबर 2020 मध्ये दिसलेलं. तेव्हा या ग्रहांमधील अंतर 6.176 कोटी किलोमीटर असेल.

Trending