Home | Jeevan Mantra | Dharm | Lord Hanuman Pooja Process And Hanuman Chalisa

टिळा लावून घराबाहेर पडणे शक्य नसल्यास, मंदिरातील शेंदुराचा अशाप्रकारे करा USE

रिलिजन डेस्क | Update - Jul 17, 2018, 11:31 AM IST

मंगळवार हा हनुमान उपासनेचा दिवस आहे. ज्योतिषमध्ये हनुमान मूर्तीच्या उजव्या पायाच्या शेंदूराचे विशेष महत्त्व सांगण्यात आल

 • Lord Hanuman Pooja Process And Hanuman Chalisa

  मंगळवार हा हनुमान उपासनेचा दिवस आहे. ज्योतिषमध्ये हनुमान मूर्तीच्या उजव्या पायाच्या शेंदूराचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मान्यतेनुसार हनुमान मूर्तीच्या उजव्या पायावरील शेंदुराने रोज टिळा लावल्यास विविध प्रकारचे दोष दूर होऊ शकतात. अभ्यासात कमजोर, आत्मविश्वासाची कमी किंवा वारंवार आजारी पडत असल्यास या शेंदुराचा रोज सकाळी टिळा लावल्याने लाभ होऊ शकतो.


  अनेक लोकांना घरातूनच टिळा लावून बाहेर पडणे शक्य होत नाही. घाम आणि पाण्यामुळे टिळा कपाळावर पसरण्याची भीती राहते, यासोबतच अनेक ऑफिसमध्ये अशाप्रकारचा टिळा लावून जाणे तुमच्या इमेजला बांधण्याचे काम करते. जे लोक टिळा लावून ऑफिस किंवा इतर ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठीसुद्धा काही ज्योतिष उपाय फायदेशीर ठरू शकतात. हनुमान मंदिरातून मंगळवारी हनुमान मूर्तीच्या उजव्या पायावरील शेंदूर घर घेऊन यावा आणि पूर्ण श्रद्धेने रोज कपाळावर लावल्यास लाभ होऊ शकतो.


  अशाप्रकारे लावा टिळा
  1. मूर्तीवरील शेंदूर एखाद्या स्वच्छ कागदावर किंवा भांड्यात घरी घेऊन या.


  2. मंगळवारी स्नान केल्यानंतर कपाळावर हा टिळा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.


  3. हनुमानाला गूळ-शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. चमेलीचे तेल आणि शेंदूर अर्पण करावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हा टिळा लावण्याचे फायदे आणि इतरही खास गोष्टी...

 • Lord Hanuman Pooja Process And Hanuman Chalisa

  होतात हे फायदे 
  1. शेंदुराचा टिळा लावल्याने तुमच्या जवळपास नकारत्मक शक्ती येणार नाही.


  2.  मनातील भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढेल. 


  3. एखाद्या कामामध्ये मन एकाग्र होत नसल्यास या समस्येतून मुक्ती मिळेल.


  4. तुम्ही आजारपण आणि डिप्रेशनमुळे त्रस्त असाल तर याविरुद्ध लढण्यासाठीची शक्ती हनुमान चालीसाचा पाठ आणि शेंदुराचा टिळा लावल्याने मिळू शकते.

 • Lord Hanuman Pooja Process And Hanuman Chalisa

  टिळा लावणे शक्य नसल्यास करू शकता हे तीन काम 
  1. प्रत्येक मंगळवार किंवा शनिवारी शेणाच्या गोवरीवर थोडेसे कुंकू टाकून घरात धूर करावा.


  2. घराच्या तिजोरीत, अलमारीत किंवा देवघरात हनुमानाच्या उजव्या पायाचा शेंदूर एखाद्या डबीमध्ये ठेवावा.


  3. हा शेंदुर एखाद्या लॉकेटमध्ये टाकूनही गळ्यात धारण करू शकता. यामुळे सकारात्मक प्रभाव पडू शकतो.

Trending