Home »Jeevan Mantra »Dharm» Makar Sankranti 2018 Shubh Muhurt And Yog

सर्वार्थसिद्धी योगामध्ये साजरी होणार संक्रांती, 3 तास 55 मिनिटांचा राहील पुण्यकाळ

जीवन मंत्र डेस्क | Jan 12, 2018, 09:59 AM IST

मकरसंक्रांती हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी एक आहे. धर्म ग्रंथांनुसार सुर्य एका सौर वर्षा(365) मध्ये क्रमानुसार 12 राशींमध्ये भ्रमण करतो. सुर्य एखाद्या राशिमध्ये प्रवेश करतो त्याला संक्रांती म्हणतात. जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांती साजरी केली जाते. सूर्याचे मकर राशीत जाणे खुप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीपासुनच देवतांचा दिवस सुरु होतो, ज्याला उत्तरायण म्हटले जाते. यावेळी मकर संक्रांती पर्व 14 जानेवारीला रविवारी असल्याने उत्तरायण देखील याच दिवशी असेल. रविवारी ध्रुव, पारिजात आणि सर्वार्थसिद्धी योग जुळून येत असल्यामुळे या शुभ पर्वाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.


काय आहे उत्तरायण
धर्मग्रंथांमध्ये उत्तरायणला देवतांचा दिवस तसेच दक्षिणायनला देवतांची रात्र म्हटले गेले आहे. शास्त्रांमध्ये उत्तरायणला सकारात्मकतेचे प्रतिक मानले गेले आहे. यामुळे ही वेळ जप, तप, दान, स्नान, श्राध्द, तर्पण इत्यांदींसाठी विशेष आहे. मकर संक्रांतीला सूर्यच्या राशिमध्ये झालेल्या परिवर्तनाला अंधकारापासुन प्रकाशाकडे अग्रेसर होणे मानले जाते. या वेळी संपूर्ण भारतात लोकांव्दारे विविध रुपांमध्ये सूर्यदेवाची उपासना आणि पूजा करुन, त्यांच्या प्रति कृतज्ञता प्रकट केली जाते. सूर्याचा गतिशी संबंध असल्यामुळे हे पर्व आपल्या जीवनात गति, नव चेतना, नव उत्साह आणि नव स्फूर्तिचे प्रतीक आहे. यामुळे आपल्याला जीवनात यश मिळते. उत्तरायणाचे महत्त्व याच तथ्याने स्पष्ट होते की, आपल्या ऋषि-मुनिंने या वेळेला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले आहे. उपनिषदांमध्ये या पर्वाला देव दान देखील म्हटले आहे.


पुढे वाचा, किती वेळ राहील पुण्यकाळ आणि तीन शुभ योगांचा कसा राहील तुमच्यावर प्रभाव...

Next Article

Recommended