आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छेनुसार करा या देवी मंत्रांचा जप, लवकर प्राप्त होऊ शकतात शुभ फळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी 14 जुलैपासून आषाढ मासातील गुप्त नवरात्री सुरु झाली असून रविवार 21 जुलैपर्यंत राहील. यावेळी देवी पूजेचा हा उत्सव 8 दिवस चालेल. या दिवसांमध्ये देवीची विशेष पूजा केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या पूजेने सर्व अडचणी दूर होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार दुर्गा सप्तशतीमध्ये वेगवेगळ्या इच्छा पूर्तीसाठी वेगवेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, काही खास मंत्र आणि जपाचा सामान्य विधी...


# या विधीनुसार करावा मंत्र जप 
> नवरात्री काळात सकाळ-संध्यकाळ स्नान केल्यानंतर घरातील एखाद्या पवित्र ठिकाणी लाल वस्त्रावर देवीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा.
> मूर्तीवर हळद-कुंकू, अक्षता, लाल फुल अर्पण करावे.
> गायीच्या शुद्ध तुपात बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. 
> धूप-दीप लावा.
> त्यानंतर मंत्र जप करावा.
> मंत्र जप कमीत कमी 108 वेळेस करावा.
> हा मंत्र जप तुम्ही एखाद्या मंदिरातही करू शकता.


# भाग्य बाधा दूर करण्यासाठी करावा या मंत्राचा जप
देहि सौभाग्य आरोग्यं देहि में परमं सुखम्।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि।।


# दरिद्रता दूर करण्यासाठी करावा या मंत्राचा जप 
दुर्गे स्मृता हरसि भीतिशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि।
दारिद्रयःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्दचित्ता।।


# सर्व सुख प्राप्त करण्यासाठी करावा या मंत्राचा जप 
ऊँ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन खास मंत्र...

बातम्या आणखी आहेत...