आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 गोष्टींमुळे कोणत्याही स्त्रीचे आयुष्य होऊ शकते उध्वस्त, चुकूनही करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू ध्रामामध्ये मनुस्मृती ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये जीवन सुखी करणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या सहकार्याने केली होती, अशी मान्यता आहे. या ग्रंथामध्ये लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित विविध सांगण्यात आलेले विविध सूत्र आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमानुसार स्त्रियांनी सहा कामांपासून नेहमी दूर राहावे. ती 6 कामे खालीलप्रमाणे आहेत...


श्लोक
पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोटनम्।
स्वप्नोन्यगेहेवासश्च नारीणां दूषणानि षट्।।

या श्लोकामध्ये सहा कामे महिलांसाठी वर्ज्य सांगण्यात आली आहेत. 


सुरापान (दारू पिणे)
हिंदू धर्मामध्ये महिलांचा मुख्य दागिना लाज, मर्यादा मानण्यात आला आहे. स्त्रियांसाठी एक मर्यादा ठरवण्यात आली आहे. जेव्हा एखादी महिला स्वतःची मर्यादा ओलांडते तेव्हा तिला अपयशाचा सामना करावा लागतो. मद्यप्राशन म्हणजे दारू प्यायल्याने स्त्रीला चांगल्या-वाईट गोष्टीचे भान राहत नाही आणि कधीकधी ती मर्यादाहीन आचरण करून बसते. दारू पिणार्‍या महिलांना समाजातही योग्य स्थान मिळत नाही. अशा महिलांना कुटुंबातही अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे दारू पिणे केवळ व्यक्तीसाठी नाही तर समाजासाठीसुद्धा हानिकारक आहे.


दररोज चुकीच्या वेळेला झोपणे -
स्त्रियांनी अवेळी आणि उशिरापर्यंत झोपल्याने घरात कलहाची स्थिती निर्माण होते. उशिरापर्यंत झोपल्यामुळे स्त्री घरातील कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करू शकत नाही आणि अवेळी झोपल्यामुळे कुटुंबातील लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होऊ लागतो. याचा प्रभाव दाम्पत्य जीवनावरही पडतो. अवेळी आणि उशिरापर्यंत झोपणार्‍या स्त्रियांना शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. उदा. आळस, लठ्ठपणा इ. याचा प्रभाव दिनचर्येवर पडू शकतो. यामुळे स्त्रियांनी दररोज अवेळी आणि उशिरापर्यंत झोपू नये. 


पतीपासून वेगळे राहणे -
मनुस्मृतीनुसार लहानपणी स्त्रीचे रक्षण वडील करतात आणि तारुण्यात पती. वृद्धावस्थेत तिचे रक्षण मुलगा करतो. अशाप्रकारे लग्नानंतर स्त्रीने पतीसोबतच राहावे. पती आजारी किंवा संकटात असल्यास पतीला सोडून कुठेही जाऊ नये. पत्नी धर्माचे पालन करून प्रत्येक अवघड परिस्थितीचा एकजुटीने सामना करावा. पतीपासून दूर राहणार्‍या स्त्रीला समाजात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर-कुटुंबात आणि समजात योग्य मान-सन्मान मिळवण्यासाठी स्त्रीने जोडीदारसोबतच राहणे आवश्यक आहे. पतीसोबत स्त्री अधिक सशक्त आणि सुरक्षित राहते.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या कामांपासून महिलांनी दूर राहावे...

बातम्या आणखी आहेत...