आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या पदार्थांचा दाखवा नैवेद्य, पूर्ण होऊ शकते प्रत्येक इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मानुसार एक वर्षात चार नवरात्री येतात, परंतु सामान्यतः दोन नवरात्रींची (चैत्र आणि शारदीय) माहिती सर्वांना असावी. आषाढ तसेच माघ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणतात. सध्या आषाढ मासातील नवरात्री चालू आहे. आषाढ मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदापासून नवमी तिथीपर्यंत गुप्त नवरात्री साजरी केली जाते. यावेळी हा उत्सव 14 जुलैपासून 21 जुलै शनिवारपर्यंत राहील. 14 जुलैला दोन तिथी (प्रतिपदा आणि द्वितीय) एकत्र असल्यामुळे गुप्त नवरात्री आठ दिवस साजरी केली जाईल. देवी पुराणानुसार नवरात्रीमध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत देवीला विशेष पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर हा नैवेद्य भक्त, गरिबांना वाटावा. यामुळे व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. गुप्त नवरात्रीमध्ये कोणत्या तिथीला देवीला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा...


1. प्रतिपदा तिथी (14 जुलै, शनिवार) च्या दिवशी देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा आणि दान करावे. यामुळे आजारातून मुक्ती मिळू शकते.
2. द्वितीया तिथी (14 जुलै, शनिवार) ला देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. हा उपाय केल्याने आयुष्य वाढते.
3. तृतीया तिथी (15 जुलै, रविवार) ला देवीला दूध अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्ती मिळते.
4. चतुर्थी तिथी (16 जुलै, सोमवार) ला देवीला मालपुआचा नैवेद्य दाखवावा. यामुळे समस्यांचा अंत होऊ शकतो.
5. पंचमी तिथी (17 जुलै, मंगळवार) च्या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे कुटुंबात सुख-शांती राहील.
6. षष्ठी तिथी (18 जुलै, बुधवार) ला देवीला मधाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे धन प्राप्तीचे योग जुळून येऊ शकतात.
7. सप्तमी तिथी (19 जुलै, गुरुवार) ला देवीला गुळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे गिरबी दूर होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अष्टमी आणि नवमी तिथीला कोणता नैवेद्य दाखवावा...

 

बातम्या आणखी आहेत...