Home | Jeevan Mantra | Dharm | Measures Of Lunar Eclipse On July 27

शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण आज, या छोट्या-छोट्या उपायांनी दूर होईल निगेटिव्ह प्रभाव

रिलिजन डेस्क | Update - Jul 27, 2018, 10:31 AM IST

आज (27 जुलै, शुक्रवार) शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण होत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हे ग्र

 • Measures Of Lunar Eclipse On July 27

  आज (27 जुलै, शुक्रवार) शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण होत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हे ग्रहण जवळपास 3 तास 55 मिनिटांचे राहील. ग्रहणाचा स्पर्श रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी होईल आणि मोक्ष सकाळी 4 वाजता होईल. ग्रहण काळात काही सोपे आणि छोटे-छोटे उपाय केल्यास विविध अडचणी दूर होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही खास उपाय सांगत आहोत...


  या लोकांनी राहावे सावध
  या चंद्रग्रहणाचा सर्वात जास्त नकारात्मक प्रभाव मकर राशी आणि लग्न असलेल्या लोकांवर पडेल. या व्यतिरिक्त ज्या लोकांचा जन्म उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्रामध्ये झाला असेल त्यांच्यावरही वाईट प्रभाव पडेल. कुंडलीत ग्रहण योग असलेल्या लोकांनी आजच्या दिवशी सावध राहावे.


  येथे जाणून घ्या, काही खास उपाय...


  1. चंद्रग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी सुंदरकांड किंवा हनुमान चालीसाचा पाठ करावा.
  2. मनातल्या मनात कुलदेवतेचे नामस्मरण करावे.
  3. चंद्र मंत्रांचा जप करावा
  - ऊं सों सोमाय नम:
  - ऊं भूर्भुव: स्व: अमृतांगाय विदमहे कलारूपाय धीमहि तन्नो सोमो प्रचोदयात्।
  4. ग्रहण सुरु होण्यापूर्वी शिवलिंगावर पांढरे चंदन अर्पण करावे आणि समाप्त झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा.
  5. ग्रहण काळात महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या उपायाने तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.
  ऊं हौं जूं सः ऊं भूर्भुवः स्वः ऊं त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्‍धनान् मृत्‍योर्मुक्षीय मामृतात् ऊं स्वः भुवः भूः ऊं सः जूं हौं ऊं


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • Measures Of Lunar Eclipse On July 27

  6. ग्रहण काळात राशी स्वामी मंत्राचा जप करावा. यामुळे शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

 • Measures Of Lunar Eclipse On July 27

  7. धन लाभासाठी राशीनुसार लक्ष्मी मंत्राचा जप करावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील.

Trending