आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिनी एकादशी 26 ला : या विधीनुसार करा हे व्रत, प्राप्त होईल विष्णू कृपा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. या एकादशीच्या दिवशी मनोवांच्छित फळ प्राप्तीसाठी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या वर्षी ही एकादशी 26 एप्रिल, गुरुवारी आहे. धर्म ग्रंथानुसार ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्य मोहमाया आणि पापातून मुक्त होतो.


येथ जाणून घ्या या व्रताचा विधी...
या व्रताचे पालन दशमी तिथी (25 एप्रिल, बुधवार) पासूनच करावे. या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या चतुर्भुज रुपाची पूजा करावी. जेवढे शक्य असेल तेवढे दशमी आणि एकादशीच्या दिवशी कमीत कमी बोलावे. दशमी तिथीला जेवणात तामसिक पदार्थांचे सेवन करू नये आणि पूर्ण ब्रह्मचर्यचे पालन करावे.


एकादशी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर संकल्प करावा. संकल्प केल्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर श्रीविष्णूच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करून पूजा करावी. व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत. रात्रभर जागरण करावे. या व्रताचे समापन एकादशीला होत नाही तर द्वादशीला सकाळी ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा दिल्यांनतर हे व्रत समाप्त होते.

बातम्या आणखी आहेत...